VIRAL NEWS : तोंडात सिगारेट, हातात हत्यार, इन्स्टाग्राम ते रस्त्यावरच्या लोकांना घाबरवणाऱ्या “लेडी डॉन”ला अटक

२०२० मध्ये मारण्यात आलेला गॅंगस्टर दुर्लभ कश्यप हा सुध्दा सोशल मीडियावर अधिक प्रसिध्द होता. त्याने सुध्दा अशाच पध्दतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

VIRAL NEWS : तोंडात सिगारेट, हातात हत्यार, इन्स्टाग्राम ते रस्त्यावरच्या लोकांना घाबरवणाऱ्या लेडी डॉनला अटक
sonia don madhya pradesh
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Jan 14, 2023 | 11:27 AM

मध्यप्रदेश : राज्यातील एक तरुणी सोशल मीडियावर (Social media) चांगलीचं प्रसिध्दीस आली आहे. उज्जैन (Ujjain) जिल्ह्यातील पोलिसांनी (MP police) तिला अटक केल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. सोशल मीडियावरुन लोकांना घाबरवत असल्यामुळे तिला ताब्यात घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. आतापर्यंत तरुणीने सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडीओमध्ये चाकू, बंदुक, अशा हल्ला करणाऱ्या वस्तू तिच्या हातात दिसत आहेत. पोलिसांनी ज्यावेळी तरुणीला ताब्यात घेतली, त्यावेळी तिच्याकडची सगळी हत्यारं ताब्यात घेतली आहेत.

२०२० मध्ये मारण्यात आलेला गॅंगस्टर दुर्लभ कश्यप हा सुध्दा सोशल मीडियावर अधिक प्रसिध्द होता. त्याने सुध्दा अशाच पध्दतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले होते. सोनिया गॅंगस्टर सुध्दा त्याच्या विचाराने प्रेरित आहे. त्याचबरोबर त्यांच्यासारखा कारनामा सोशल मीडियावर करीत आहे. सोनियाच्या काही व्हिडीओमध्ये तिने दुर्लभ कश्यप सारखी वेशभूषा केली असल्याचं दिसतं आहे.

सोनिया लोकांना हत्यार दाखवून घाबरवत असल्यामुळे पोलिसांनी तिला ताब्यात घेतली आहे. तिच्याकडे दोनशे रुपये आणि चाकू सापडले असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचबरोबर तिचे वडील ती लहान असताना वारले आहेत. सोनिया तिच्या आईसोबत राहते. तिचं वय सध्या 19 आहे.