CWG 2022 Day 4, Schedule: कॉमनवेल्थ मध्ये भारतीय खेळाडूंचे आजचे सामने आणि वेळा जाणून घ्या….

| Updated on: Aug 01, 2022 | 10:09 AM

CWG 2022 Day 4, Schedule: कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा आज चौथा दिवस आहे. वेटलिफ्टिंगमधून आजही भारतीय खेळाडू पदकविजेती कामगिरी करु शकतात. जूडो, टेबल टेनिस, बॉक्सिंग मध्ये भारतीय खेळाडू पदकाच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतील.

CWG 2022 Day 4, Schedule: कॉमनवेल्थ मध्ये भारतीय खेळाडूंचे आजचे सामने आणि वेळा जाणून घ्या....
cwg day 4
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स 2022 चा आज चौथा दिवस आहे. वेटलिफ्टिंगमधून आजही भारतीय खेळाडू पदकविजेती कामगिरी करु शकतात. जूडो, टेबल टेनिस, बॉक्सिंग मध्ये भारतीय खेळाडू पदकाच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतील. बॅडमिंटन मध्ये भारतीय संघ मेडल पक्कं करण्याच्या इराद्याने उतरेल. त्याआधी क्वार्टर फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवावा लागेल. आज सोमवारी टेबल टेनिस मध्ये भारतीय पुरुष संघ मेडल निश्चित करण्यासाठी मैदानात उतरेल. भारतीय टीमचा सेमीफायनल सामना संध्याकाळी 4.30 ते 9.30 दरम्यान खेळला जाईल. बॅडमिंटन मध्ये मिक्स्ड टीम इवेंटचा सेमीफायनल सामना सकाळी 11 वाजल्यापासून सुरु होईल. भारताला क्वार्टर फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवावा लागेल.

वेटलिफ्टिंग मध्ये आणखी पदकं मिळू शकतात

भारताने आतापर्यंत 6 पदकं मिळवली आहेत.यात वेटलिफ्टिंग मध्ये 3 गोल्ड मेडल आहेत. वेटलिफ्टिंग मध्ये आणखी पदकं मिळू शकतात. 81 किलो वजनी गटात अजय सिंह दुपारी 2 वाजता, महिला 71 किलो वजनी गटात हरजिन्दर कौरचा रात्री 11 वाजता सामना आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ संध्याकाळी 6.30 वाजता इंग्लंड विरुद्ध मैदानात उतरेल.

स्क्वॉश मध्ये आज कोणाचे सामने?

स्क्वॉश मध्ये दुपारी 12 ते 3 दरम्यान सारा कुरुविला महिला एकेरी प्लेट क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये उतरेल. जोशना चिनप्पा दुपारी दीड वाजता हॉली विरुद्ध क्वार्टर फायनलचा सामना खेळेल.

बॉक्सिंग, जुडोचे सामने कधी?

स्टार भारतीय बॉक्सर अमित पंघाल 48 किलो वजनी गटात प्री क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये उतरेल. दुपारी 12 ते 3 दरम्यान सामना खेळला जाईल. सुमित कुंडु प्री क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये उतरेल. जूडो मध्ये दुपारी 2.30 वाजता विजय कुमार 60 किलो, जसलीन सिंह 66 किलो मध्ये आव्हान देतील. साजन प्रकाश पुरुष 100 मीटर बटरफ्लाय, सुयश जाधवन, निरंजन मुकुंदन 50 मीटर फ्री स्टाइल मध्ये आव्हान सादर करतील.