CWG 2022: PV Sindhu ने भारतासाठी जिंकलं गोल्ड मेडल, कॉमनवेल्थ मध्ये पहिल्यांदा मिळवलं मोठं यश

CWG 2022: कॉमनवेल्थ गेम्स 2022 स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. भारतासाठी दिवसाची सुरुवात सुवर्णपदकाने झाली आहे. आज सुरुवातीलाच बॅडमिंटन महिला एकेरीची फायनल झाली.

CWG 2022: PV Sindhu ने भारतासाठी जिंकलं गोल्ड मेडल, कॉमनवेल्थ मध्ये पहिल्यांदा मिळवलं मोठं यश
sindhu gold
Image Credit source: twitter
| Updated on: Aug 08, 2022 | 3:23 PM

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स 2022 (CWG 2022) स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. भारतासाठी दिवसाची सुरुवात सुवर्णपदकाने झाली आहे. आज सुरुवातीलाच बॅडमिंटन महिला एकेरीची फायनल झाली. या लढतीत अंतिम सामन्यात भारताच्या PV Sindhu ने कॅनडाच्या मिशेल ली वर विजय मिळवला. या विजयासह सिंधुने कॉमनवेल्थ मध्ये पहिल्यांदा सुवर्णपदकाला गवसणी घातली. बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स मधील भारताचं हे 19 व गोल्ड मेडल आहे. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये पहिल्यांदाच सिंधुने सुवर्णपदक विजेती कामगिरी केली आहे.

डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही.

पीव्ही सिंधुने आजच्या सामन्यात प्रतिस्पर्धी मिशेल ली डोकं वर काढण्याची संधीच दिली नाही. तिने सरळ गेम मध्ये विजय मिळवला. सिंधुने पहिला 21-15 असा जिंकला. दुसऱ्या गेम मध्ये 21-13 असा विजय मिळवला. कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये बॅडमिंटनमधील भारताचं हे पहिलं गोल्ड मेडल आहे.

गोल्डची हुकलेली संधी सिंधूने आज साधली

भारताच्या बॅडमिंटन संघाने आधीच तीन मेडल्स जिंकले आहेत. मिश्र दुहेरीत रौप्य पदक मिळवलं आहे. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक जिंकणाऱ्या सिंधुला अजून कॉमनवेल्थ मध्ये गोल्ड मिळवता आलं नव्हतं. 2018 सालच्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्स मध्ये अंतिम फेरीत तिचा पराभव झाला होता. आज सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्याने ती मैदानात उतरली होती. कारण मिश्र दुहेरीच्या फायनल मध्ये पराभूत झाल्यामुळे तिने आधीच संघाला निराश केलं आहे.

पदकतालिकेत सुधारणा करण्याची संधी

पदकतालिकेत भारत सध्या पाचव्या स्थानी आहे. भारताच्या पुढे न्यूझीलंड आहे. दोघांच्या सुवर्णपदकांमध्ये फक्ता एका मेडलच अंतर आहे. त्यामुळे आजच्या शेवटच्या दिवशी भारतीय खेळाडू कशी कामगिरी करतात, त्यावर पदकतालिकेत भारताचं स्थान निश्चित होईल. भारत टॉप 5 मध्ये आहे. पण त्यात अजून एकास्थानाची सुधारणा करण्याची संधी आहे. बॅडमिंटन मध्ये भारताला आज तीन गोल्ड मेडल जिंकण्याची संधी आहे.