CWG 2022: फक्त 1 किलोच्या फरकाने सांगलीच्या Sanket Sargar चं सुवर्णपदक हुकलं

कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताने पदकांच खात उघडलं आहे. वेटलिफ्टिंग मध्ये 55 किलो वजनी गटात संकेत सर्गरने देशाला यंदाच्या कॉमनवेल्थ मधलं पहिलं रौप्यपदक मिळवून दिलं.

CWG 2022: फक्त 1 किलोच्या फरकाने सांगलीच्या Sanket Sargar चं सुवर्णपदक हुकलं
| Updated on: Jul 30, 2022 | 5:18 PM

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्स मध्ये भारताने पदकांच खात उघडलं आहे. वेटलिफ्टिंग मध्ये 55 किलो वजनी गटात संकेत सर्गरने देशाला यंदाच्या कॉमनवेल्थ मधलं पहिलं रौप्यपदक मिळवून दिलं. त्याने एकूण 248 किलो वजन उचललं. फक्त 1 किलो वजनाच्या फरकाने संकेतच सुवर्णपदक हुकलं. क्लीन अँड जर्कमध्ये दुसऱ्या प्रयत्नात सागरला दुखापत झाली. पण तरीही त्याने सुवर्णपदक जिंकण्याचा तिसरा प्रयत्न केला. संकेतने शेवटच्या प्रयत्नात 139 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. पण होणाऱ्या वेदनांमुळे तो इतकं वजन उचलू शकला नाही. त्याने वजन उचलण्याचा प्रयत्न केला. पण त्याला प्रचंड त्रास होत होता. संकेतच्या त्या प्रयत्नानंतर कॉमेंटेटर्स एवढ सुद्धा म्हणाले की, हा खेळाडू आपल्या करीयरसोबत खेळतोय.

संकेतला झालेली दुखापत गंभीर

संकेतला झालेली दुखापत गंभीर वाटतेय. कारण मेडल सेरेमनीच्या वेळी सुद्धा त्याला त्रास होत होता. त्याच्या हाताला पट्टी बांधलेली होती. निराशा आणि वेदना त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. 55 किलो वजनी गटात मलेशियाच्या मोहम्मद अनीक कासदानने गोल्ड मेडल जिंकलं. क्लीन अँड जर्क मध्ये शेवटच्या प्रयत्नात त्याने 142 किलो वजन उचललं. त्याचा स्कोर 249 किलो झाला. फक्त एक किलोच्या फरकाने संकेतला सुवर्णपदकावर पाणी सोडावं लागलं.

भात खाणं बंद केलं

मी भुवनेश्वर मध्ये पोहोचलो, तेव्हा माझं वजन 56.7 किलोग्रॅम होतं. त्यानंतर मी तात्काळ कार्बोहायड्रेट सारखे पदार्थ भात बंद केला. उकडलेल्या भाज्या आणि सॅलेड सुरु केलं. मी पाणी पिण सुद्धा कमी केलं. हे सर्व नियम डाएट पाळलं, आज त्यामुळेच त्याला देशाचा गौरव वाढवता आला.

12 तास मेहनत केली

कॉमनवेल्थ मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या संकेतने वेटलिफ्टिंगची प्रॅक्टिस वयाच्या 13 व्या वर्षी सुरु केली होती. त्यावेळी कदाचित दुसरी मुलं या खेळाकडे वळली होती. संकेत 12-12 तास सराव करायचा. आज पदक मिळवलं, त्याच मेहनतीचा हा परिणाम आहे.