AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसटीमधील सर्वात मोठी मेगाभरती लवकरच, कोणाला मिळणार प्राधान्य? किती जागा भरणार? A टू Z माहिती समोर

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (एसटी) १७,७४२ पदांची मेगा भरती होणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली असून, कंत्राटी कर्मचाऱ्यांना या भरतीत प्राधान्य मिळणार आहे.

एसटीमधील सर्वात मोठी मेगाभरती लवकरच, कोणाला मिळणार प्राधान्य? किती जागा भरणार? A टू Z माहिती समोर
ST Bus
| Updated on: Mar 12, 2026 | 8:12 AM
Share

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. एसटी महामंडळात लवकरच १७ हजार ७४२ पदांची मेगा भरती करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत केली. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांना आणि सध्या कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

वित्त विभागाच्या परवानगीची प्रतीक्षा

परिवहन विभागाने या अवाढव्य पदभरतीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या वित्त विभागाकडे सादर केला आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीची प्रवासी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी मनुष्यबळाची अत्यंत गरज आहे. वित्त विभागाची तांत्रिक मंजुरी मिळताच या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. यानतंर ही प्रक्रिया युद्धपातळीवर राबवली जाईल, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

विधान परिषदेत श्रीकांत भारतीय यांनी एसटीमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना परिवहन मंत्र्यांनी महत्त्वाचे आश्वासन दिले. २०२२ च्या एसटी संपादरम्यान सेवा खंडित होऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. आगामी १७ हजार ७४२ पदांच्या भरतीमध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे, जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा महामंडळाला फायदा होईल.

बसेसची वाढती संख्या आणि कर्मचाऱ्यांची चणचण

एसटी महामंडळाच्या ताफ्यात होणारी वाढ हे या भरतीमागचे मुख्य कारण आहे. संपाच्या काळात एसटीकडे सुमारे १२,५०० बसेस होत्या, ही संख्या आता १४,००० वर पोहोचली आहे. त्यातच महायुती सरकारने दरवर्षी ५,००० नवीन बसेस खरेदी करण्याचे ध्येय ठेवले आहे. यासाठी ८,००० नवीन बसेस खरेदीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यातील ३ हजार बसेसचे टप्प्याटप्प्याने वितरण सुरू झाले आहे. बसेसची संख्या वाढत असताना चालक, वाहक आणि कार्यशाळेतील तंत्रज्ञांची संख्या अपुरी पडत आहे. ही दरी भरुन काढण्यासाठी ही मेगाभरती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

या चर्चेदरम्यान माजी परिवहन मंत्री अनिल परब, प्रवीण दरेकर आणि इतर सदस्यांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका मांडली. संपाच्या काळात ज्या नेत्यांनी भूमिका घेतली होती, त्यांनी आता सत्तेत असताना कंत्राटी कामगारांना पूर्णवेळ सरकारी नोकरीत सामावून घेण्याबाबत ठोस पावले उचलावीत, अशी मागणी विरोधकांनी केली.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...