AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ खेळणार आणखी एक सामना, तारीख जाणून घ्या…

भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका सुरु होणार आहे. आता या कसोटी मालिकेपूर्वीही भारतीय संघ एक सामना खेळणार आहे. तर हा सामना का खेळणार आहे यामागचे कारण जाणून घ्या...

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ खेळणार आणखी एक सामना, तारीख जाणून घ्या...
| Updated on: Jul 28, 2026 | 3:45 PM
Share

पुढील महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेची तयारी सुरू झाली आहे. बीसीसीआयने संघांची घोषणा केली आहे, कोणते खेळाडू खेळतील आणि कोणाला वगळले जाईल हे स्पष्ट केले आहे. एका नवीन खेळाडूलाही संघात सामील केले आहे. सारांश जैन या नवीन खेळाडूचे नाव आहे. इतकेच नाही, तर कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संध एक सामना खेळणार आहे. भारतीय संघ एक सराव सामनाही खेळणार आहे. याचीही घोषणा करण्यात आली असून, सामन्याची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. शुभमन गिल पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करेल आणि केएल राहुल उपकर्णधार असेल.

ऑगस्ट महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार असून, तिथे दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. मालिकेतील पहिला सामना 15 ऑगस्ट रोजी सुरू होऊन 19 ऑगस्टपर्यंत चालेल, तर दुसरा सामना 23 ऑगस्ट रोजी सुरू होईल. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग म्हणून खेळवली जाईल, जिथे भारतीय संघ गुणतालिकेत खूप खालच्या क्रमांकावर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली ही मालिका जिंकून भारताला गुणतालिकेत पुढे जाण्याची संधी मिळेल. हे काम सोपे नसेल; श्रीलंकेचा संघ घरच्या मैदानावर खूप मजबूत खेळतो आणि त्यांना तिथे हरवणे सोपे नाही.

दरम्यान, बीसीसीआयने मालिकेसाठी संघाची घोषणा केली. तसेच, कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय संघ चार दिवसांचा सराव सामना खेळेल, असेही सांगण्यात आले. हा सामना 7 ऑगस्ट रोजी सुरू होईल. चार दिवसांचा सामना असल्याने तो  10 ऑगस्ट रोजी संपेल. हा सामना कोलंबो येथे खेळवला जाईल. या सामन्यामुळे भारतीय संघाला आपल्या तयारीचे मूल्यांकन करण्याची आणि तेथील परिस्थितीशी जुळवून घेण्याची संधी मिळेल.

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर: शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन.

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...