AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीसीसीआयचा अजब फर्मान! कॅप्टन गिलसह दोन खेळाडूंसाठी सक्त नियम, करो किंवा मरो परिस्थिती

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दौरा होणार असून या दौऱ्यापूर्वी भारतीय संघासाठी बीसीसीआयने एक फर्मान काढला आहे. बीसीसीआयने आता मोजक्या खेळाडूंसाठी काही कठोर निर्बध लादले आहेत.

बीसीसीआयचा अजब फर्मान! कॅप्टन गिलसह दोन खेळाडूंसाठी सक्त नियम, करो किंवा मरो परिस्थिती
| Updated on: Sep 30, 2026 | 1:28 PM
Share

शुभमन गिल आणि केएल राहुल सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळण्यात व्यस्त आहेत. जसप्रीत बुमराह आशियाई खेळांसाठी जपानला गेला आहे. त्यानंतर ते रणजी ट्रॉफीमध्ये आपापल्या संघांकडून खेळताना दिसू शकतात. गिल, राहुल आणि बुमराह यांच्या रणजी ट्रॉफीमधील सहभागामागे न्यूझीलंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जारी केलेला बीसीसीआयचा आदेश असू शकतो.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी प्रत्येक वरिष्ठ खेळाडूला किमान एक रेड-बॉल सामना खेळणे अनिवार्य असेल. बीसीसीआयच्या या आदेशानुसार, शुभमन गिल आणि केएल राहुल आपापल्या राज्य संघांकडून रणजी सामने खेळताना दिसू शकतात. रणजी ट्रॉफी ११ ऑक्टोबरला सुरू होत आहे, ज्यात शुभमन गिल पंजाबकडून खेळू शकतो. केएल राहुल कर्नाटक संघाकडून खेळताना दिसू शकतो. जसप्रीत बुमराह देखील न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी इंडिया ‘अ’ संघाकडून एकतर रणजी ट्रॉफी सामना किंवा रेड-बॉल सामना खेळेल.

टाइम्स ऑफ इंडियाने लिहिले आहे की, एक वरिष्ठ खेळाडू किती लाल चेंडूचे सामने खेळेल हे वैद्यकीय पथकाची परवानगी आणि खेळाडूच्या कामाच्या भारावर अवलंबून असेल. काही खेळाडू दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळतात. त्यामुळे, कोणतीही तडजोड न करता त्यांना लाल चेंडूचे सामने खेळण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय किंवा कामाच्या भाराशी संबंधित कोणतीही अडचण नसल्यास, कर्णधार गिलसह प्रत्येक वरिष्ठ खेळाडूला किमान एक लाल चेंडूचा सामना खेळणे बंधनकारक असेल.

बीसीसीआयचा हा निर्णय न्यूझीलंड दौऱ्याच्या तयारीसाठी आहे. भारताचा न्यूझीलंड दौरा २२ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. भारतीय संघ १९ नोव्हेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. लाल चेंडूच्या सरावाशिवाय मालिकेत उतरण्याचे परिणाम भोगावे लागू नयेत, अशी बीसीसीआयची इच्छा आहे, म्हणूनच सर्व वरिष्ठ खेळाडूंना किमान एक सामना खेळणे अनिवार्य केले आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटची कसोटी मालिका २०२४ मध्ये खेळली गेली, जी तीन सामन्यांची मालिका होती. ही मालिका भारतात खेळली गेली, जिथे न्यूझीलंडने भारताला व्हाईटवॉश दिला. मायदेशात न्यूझीलंडकडून भारताचा हा पहिला कसोटी मालिका पराभव होता. आता हेच चित्र पुन्हा दिसू नये म्हणू बीसीसीआयने थेट हा फर्मान काढला असावा असे म्हटले जात आहे.

Follow Us
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर