AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : संकट मोठं… राज्यात एक दशकानंतर सर्वात कमी पावसाची नोंद, रब्बीवरही संकट? हवामान खात्याचा मोठा इशारा

राज्यात दशकभरात सर्वात कमी पाऊस झाल्याने भीषण दुष्काळाची स्थिती आहे. अनेक ठिकाणी पावसाचा थेंबही नाही, तर काही ठिकाणी अपुरा पाऊस झाला. यामुळे रब्बी पिकांची पेरणी धोक्यात आली असून, शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. हवामान खात्याने कमी पावसाची नोंद करत येत्या काळातही कमी शक्यता वर्तवली आहे.

Weather Update : संकट मोठं... राज्यात एक दशकानंतर सर्वात कमी पावसाची नोंद, रब्बीवरही संकट? हवामान खात्याचा मोठा इशारा
weather maharashtraImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 30, 2026 | 1:29 PM
Share

राज्यात पावसाचे चारही महिने कोरडेच गेले आहेत. दीड महिने तर राज्यातील अनेक भागात पावसाचा एक थेंबही पडला नाही. काही ठिकाणी पाऊस झाला, पण तोही समाधानकारक नव्हता. त्यामुळे राज्यात मोठा दुष्काळ पडला आहे. हवामान खात्याच्या दाव्यानुसार, एक दशकानंतर राज्यात यंदा सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. यावरून राज्यातील संकट किती मोठं आहे, हे दिसून येतं. पाऊस कमी झाल्याने रब्बी पेरणीवरही संकट उभं राहिलं आहे. त्यामुळे बळीराजाचं टेन्शन वाढलं आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख एस.डी. सानप यांनी याबाबतची माहिती दिली. एक दशकानंतर राज्यात या वर्षी सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. यंदा राज्यातील पावसाची सरासरी तूट 18% आहे. राज्यातील सर्वच विभागात यावर्षी पावसाची कमी जास्त प्रमाणात तुट निर्माण झाली आहे. मात्र, येणाऱ्या 5 ते 6 दिवसात राज्यात सर्वदूर पाऊस होण्याची कमी शक्यता. असं असलं तरी राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊनच रब्बी हंगामात पेरणी करावी, असा सल्ला एस.डी. सानप यांनी दिला आहे.

सांगलीत विजांच्या कडकडाटासह पाऊस

दरम्यान, काल सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊसाने जोरदार हजेरी लावली. सांगलीत संध्यकाळी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला. सांगली शहरासह मिरज, तासगाव आणि पलूस तालुक्यातल्या अनेक भागात देखील जोरदार पाऊसाने हजेरी लावली आहे. सायंकाळ नंतर अचानक ढगाळ वातावरण होऊन पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे वाहनधारकांची चांगली तारांबळ उडाली, तर पावसा अभावी करपून चाललेल्या पिकांना देखील पावसाने जीवदान मिळणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

खालापूरमध्ये पावसाची दमदार एन्ट्री

रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातही काल पावसाने दमदार एन्ट्री केली. तालुक्यातील काही भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरात पावसाळी वातावरण निर्माण झाले असून नागरिकांचे लक्ष आता पावसाच्या पुढील स्थितीकडे लागले आहे. पावसाच्या दमदार एन्ट्रीमुळे परिसरातील वातावरणात बदल झाला होता.

कोल्हापूरला झोपडले

कोल्हापूर शहराच्या काही भागात काल परतीच्या पावसाने हजेरी लावली. महिन्याभरानंतर शहरात पावसाच्या दमदार सरी कोसळल्याने मोठा दिलासा मिळाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली असली तरी महिनाभरापासून दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने गेल्या काही दिवसापासून उकाड्यामुळे हैरान झालेल्या शहरवासीयांनी समाधान व्यक्त केलं.

पुण्यात लष्करी अळीचं संकट

दरम्यान, पुण्याच्या भोर तालुक्यातील काही ठिकाणी मका पिकांवर लष्करी अळीचा मोठा प्रादुर्भाव झाला असून यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच कमी प्रमाणात पडलेला पाऊस.. त्यात ऐन पिकं वाढीच्या अवस्थेत असलेल्या मक्यावर या रोगाने हल्ला केल्यामुळे तालुक्यातील शेतकरी कमालीचे हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बदलणाऱ्या हवामानामुळे लष्करी अळीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मक्याच्या पोंग्यामध्ये राहून ही अळी पानांचा भाग फस्त करत आहे, ज्यामुळे झाडांची वाढ खुंटली आहे. यामुळे काही भागांत शेतातील मका पिकाचे नुकसान झाले असून, उत्पादनात मोठी घट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. महागडी बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च करूनही पीक डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

Follow Us
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर