AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : सर्वात मोठी बातमी ! पावसाळा संपला… हवामान विभाग करणार मोठी घोषणा; पण, 25 राज्यांवर मोठं संकट

महाराष्ट्रामधून मान्सूनची एक्झिट, हवामान विभागाने पावसाळा संपल्याची घोषणा केली आहे. दीड महिन्यांपासून पावसाअभावी शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडले आहेत. पाण्याची बचत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, दिल्ली-एनसीआरसह देशातील 25 राज्यांमध्ये मात्र वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Weather Update : सर्वात मोठी बातमी ! पावसाळा संपला... हवामान विभाग करणार मोठी घोषणा; पण, 25 राज्यांवर मोठं संकट
weather updateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2026 | 4:43 PM
Share

आधीच दुष्काळाने होरपळणाऱ्या राज्यातील बळीराजांसाठी अत्यंत वाईट बातमी आहे. गेले दीड महिना राज्यातील अनेक भागात पाऊस पडला नाही. त्यामुळे सप्टेंबरच्या शेवटच्या महिन्यात तरी पाऊस पडेल अशी शेतकऱ्यांना आशा होती. पण सप्टेंबर महिनाही संपल्यातच जमा आहे. पण अजूनही पाऊस आलेला नाही. आणि आता पाऊस पडण्याची सूतराम शक्यता नाहीये. हवामान विभागाने आता पाऊस पडणार नसल्याचं म्हटलं आहे. राज्यातील पावसाळा संपल्याची अधिकृत घोषणा हवामान विभाग येत्या एक दोन दिवसात करणार आहे.

नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रविण कुमार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. विदर्भातून पाऊस गायब झाला आहे. येत्या काळात विदर्भात पावसाची कुठलीही शक्यता नाहीये. लवकरच हवामान विभाग पावसाळा संपल्याचं जाहीर करणार आहे, असं प्रविण कुमार यांनी स्पष्ट केलं.

पाणी जपून वापरा

नागपूरसह संपूर्ण विदर्भात ‘ऑक्टोबर हीट’चे चटके जाणवू लागले आहेत. नागपूरचं तापमान 35 अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर आहे. तर अमरावतीचं तापमान 36 अंश सेल्सिअसच्या पार गेलं आहे. यावरून आता पावसाळ्याचे दिवस संपले आहेत. विदर्भात तर आता पावसाची शक्यता नाही. आता पाऊस येणार नाही, त्यामुळे उपलब्ध पाणीसाठा जपून वापरा, असं आवाहन प्रविण कुमार यांनी केलं आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाच्या झळा

छत्रपती संभाजीनगर शहरात ऐन पावसाळ्यात उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी शहराच्या कमाल तापमानाची नोंद 35.6 अंश सेल्सिअस इतकी झाली आहे. किमान तापमान 21.5 अंश तर आर्द्रता 44 टक्के नोंदवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी पावसाच्या एक-दोन सरी कोसळू शकतात. मात्र, पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.

सिंधुदुर्गात पावसाची एक्झिट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सर्वत्र दाट धुके आणि थंडी पडली होती. मागील 25 ते 30 दिवस पाऊस गायब असून कालपासून सकाळच्या सत्रात गारठा वाढला आहे. आज तर सर्वत्र दाट धुके पाहायला मिळाले आहेत. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पावसाची “एक्झिट” आणि गुलाबी थंडीची चाहूल दिसू लागलीय. प्रामुख्याने कोकणात ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडीचे आगमन होते. मात्र, सप्टेंबरमध्येच थंडी दाखल झाल्याने हवामान बदलाचा परिणाम जाणवू लागला आहे.

25 राज्यांवर संकट

महाराष्ट्रातून पाऊस गायब झाला असला तरी देशातील 25 राज्यांवर संकटाचे काळे ढग अजूनही घोंघावत आहेत. दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, बिहार, मेघालय, आसाम, झारखंडसह एकूण 25 राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट होऊन मुसळधार पाऊस पडणार आहे. तर काही ठिकाणी मध्यम पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. काही राज्यांमध्ये वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

Follow Us
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल.
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महत्त्वाचा टप्पा, पहिला स्टील पूल उभारला
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा...
पावसाअभावी शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांची दिवाळी संकटात; नवनीत राणा म्हणाल्या...