शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया अन् अखेर सगळंच समोर आलं
शरद पवार दिल्लीत पोहचताच बड्या घडामोडी घडल्याचा दावा करण्यात येत आहे. खासदार पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर पंतप्रधानांच्या भेटीने तर्कवितर्क लढवले जात आहेत. शरद पवार हे एनडीएसोबत खरंच जाणार का?
शरद पवार दिल्लीत पोहचताच बड्या घडामोडी घडल्याचा दावा करण्यात येत आहे. खासदार पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर पंतप्रधानांच्या भेटीने तर्कवितर्क लढवले जात आहेत. शरद पवार हे एनडीएसोबत खरंच जाणार का?
गेल्या आठवड्यात CJP आंदोलनादरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार हे दिल्लीत पोहचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतली. त्यावरून पुन्हा राष्ट्रवादी एनडीएसोबत जाण्याची चर्चा रंगली. त्याअगोदर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली. तर सुनील तटकरे यांच्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनवणे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटले. या भेटसत्राने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शरद पवार हे NDA च्या वाटेवर असल्याचा दावा करण्यात येत आहे.या प्रकरणी आता महाविकास आघाडीतील नेते नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे.त्यांनी पार्थ पवार आणि शरद पवारांच्या भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थि केले. ते म्हणाले, “कोण कुणासोबत हाच एक प्रश्न आम्ही पाहत नाही आमचं लक्ष हे आजच्या तरुण पिढीसोबत होणाऱ्या अन्यायावर आहे.” त्याच्या या वक्तव्यावरून शरद पवार NDA मध्ये सामिल होणार असल्याचा संशय बळावला आहे.अशा चर्चा आहेत. इतकेच नाही तर कृषीमंत्री दत्ता भरणे आणि भाजपचे गिरीश महाजन यांनी देखील याबाबत वक्तव्य केलं आहे.
Published on: Jul 28, 2026 03:24 PM
शरद पवारांची राष्ट्रावादी खरंच NDA मध्ये सामिल होणार? तीन प्रतिक्रिया
शेतकऱ्यांना दिलासा, कर्जमाफीच्या दुसऱ्या यादीबाबत मोठी घोषणा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय! 10-20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा
MH-CET घोटाळ्यावर आदित्य ठाकरे आक्रमक; 99 पर्सेंटाईलचं गूढ उलगडा करा

