
Ban vs SL : बांगलादेशचा संघ सध्या श्रीलंकेविरुद्ध कसोटी सामना खेळत आहे. पण या सामन्या दरम्यान अनेक विचित्र गोष्टी होत आहेत. बांगलादेशचा संघ असे काही करत आहे की कोणालाही त्यावर हसू आवरत नाहीये. पहिल्याच दिवशी चेंडू बॅटच्या मधोमध लागल्यानंतर ही बांगलादेशच्या कर्णधाराने डीआरएस घेतला होता. दुसऱ्या दिवशी तीन फिल्डर्सकडे एक झेल गेला होता पण एकालाही तो पकडता आला नाहीये. आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही बांगलादेशच्या संघाने असे काही केले जे याआधी क्वचितच पाहायला मिळाले होते.
बॅट्समनने बॅटींग करताना शॉट मारल्यानंतर एक किंवा दोन खेळाडू त्याच्या मागे धावताना पाहिले असेल. कारण एक जण डाईव्ह करुन बॉल अडवतो आणि दुसऱ्याच्या हातात देतो. त्यानंतर दुसरा खेळाडू तो विकेट कीपरकडे फेकतो. पण या सामन्यात 21व्या ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने जेव्हा एका दिशेने फटका मारला तेव्ही चौथ्या स्लिपवर उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या डाव्या बाजूने तो सीमारेषेकडे गेला. त्यावेळी बॉल पकडण्यासाठी स्लिपमध्ये उभे असलेले चारही क्षेत्ररक्षक आणि पॉइंट क्षेत्ररक्षक सगळेच पळाले.
हे 5 फिल्डर धावताना पाहून असे वाटले की जशी शर्यत सुरु आहे. बॉल हा पॉइंट प्लेअरच्या सर्वात जवळ होता आणि त्याने तो उचलला आणि धावणाऱ्या चार स्लिपपैकी एकाकडे दिला. त्यानंतर त्याने तो विकेटकीपरकडे फेकला. पण जे काम दोन फिल्डरने करायला पाहिजे होते. ते काम करण्यासाठी पाच जण धावत होते.
R̶e̶a̶l̶ ̶l̶i̶f̶e̶ ̶i̶n̶c̶i̶d̶e̶n̶t̶ ̶i̶n̶s̶p̶i̶r̶i̶n̶g̶ ̶a̶ ̶m̶o̶v̶i̶e̶
Movie inspiring a real-life incident 🎥
.
.#BANvSL #FanCode pic.twitter.com/1USI5EH9cV— FanCode (@FanCode) April 1, 2024
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंका संघाकडे आता मोठी आघाडी आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात श्रीलंकेने 531 धावा केले आहेत. पण प्रत्युत्तर देताना बांगलादेशचा संघ केवळ 178 धावा करु शकला. श्रीलंकेने फॉलोऑन न ठेवल्याने पुन्हा फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाच्या 6 गडी गमावून 102 धावा झाल्या होत्या. त्यांची एकूण आघाडी 455 धावांवर पोहोचली आहे.