AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित शर्माच्या आयुष्यात दोन घडामोडी घडणार! एक चांगली, तर पुढच्या 24 तासात दुसरी….

हिटमॅन रोहित शर्माने क्रिकेटच्या मैदानात चाहत्यांचं चांगलंच मनोरंजन केलं आहे. आता नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. दुसरीकडे, त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊयात...

रोहित शर्माच्या आयुष्यात दोन घडामोडी घडणार! एक चांगली, तर पुढच्या 24 तासात दुसरी....
रोहित शर्माच्या आयुष्यात दोन घडामोडी घडणार! एक चांगली, तर पुढच्या 24 तासात दुसरी....Image Credit source: PTI
| Updated on: Sep 02, 2026 | 7:25 PM
Share

रोहित शर्मा भारतीय क्रिकेटमधील मोठं नाव… त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी20 वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप जिंकला आहे. मात्र सध्या फक्त वनडे क्रिकेट खेळत असून टी20 आणि कसोटीतून निवृत्ती घेतली आहे. त्याचं स्वप्न 2027 साली होणारा वनडे वर्ल्डकप खेळण्याचं आहे. एका वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेसाठी त्याने वजनही कमी केलं. इतकंच काय तर या स्पर्धेसाठी जोरदार सरावही करत आहे. पण त्याची बॅट काही वनडे मालिकांमध्ये चालली नाही. त्यामुळे त्याचं संघातील स्थान कठीण असल्याची चर्चा रंगली. इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवरील सामना शेवटचा असेल असंही बोललं गेलं. पण लॉर्ड्सवर त्याने शतक ठोकलं आणि सर्वांची बोलती बंद केली. बीसीसीआयला त्यानंतर स्पष्टीकरणही द्यावं लागलं. रोहित शर्मा खेळत राहणार असं सांगितलं. पण आता मुंबईत बीसीसीआयच्या हेडक्वॉर्टरमध्ये टीम इंडियाचे निवडकर्ते, हेड कोच आणि कर्णधार यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत रोहित शर्माच्या भवितव्याचा निर्णय घेतला जाईल.

रिपोर्टनुसार, बीसीसीआय आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्यात रोहित शर्माबाबत एकमत होताना दिसत नाही. रोहित शर्मा निवडकर्त्यांच्या दृष्टीने वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेसाठी संघात फिट बसत नाही. त्यामुळे त्याची निवड हा मोठा प्रश्न आहे.  वनडे मालिकांमध्ये त्याची निवड टाळणं म्हणजेच त्याचा वनडे वर्ल्डकप विचार केला जात नाही, असाच अर्थ निघेल. त्यामुळेच बीसीसीआय या मुद्द्यावर चर्चा करणार आहे. गुरूवारी 3 सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीत रोहित शर्माच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघ पाच सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या संघात निवड होणार की नाही हे देखील ठरेल.

रोहित शर्माचा टीव्ही स्क्रिनवर झळकणार

क्रिकेटच्या मैदानानंतर रोहित शर्मा नव्या भूमिकेत दिसणार आहे. या कार्यक्रमाद्वारे तो मनोरंजन विश्वात पाऊल टाकणार आहे. त्याच्या नव्या शोचे नाव ‘फॅमिली फुल हाउस विथ रोहित शर्मा’ असं आहे. या कार्यक्रमाचा ट्रेलर समोल आला आहे. हा कार्यक्रम 19 सप्टेंबरला प्रसारित होणार असून या कार्यक्रमात रोहित शर्माचा खेळकर, मजेशीर आणि मैदानाबाहेरील न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. शोच्या नुकत्याच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये रोहित शर्माचा मैदानावरील प्रसिद्ध आणि व्हायरल झालेला “कोणीही गार्डनमध्ये फिरणार नाही” हा डायलॉग नव्या मजेशीर स्टाईलमध्ये वापरण्यात आला आहे.

Follow Us
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत...खळबळजनक...
नंबर प्लेटबाबत विचारताच आमदाराची अरेरावी, चक्क शिवगाळ करत... खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल!
लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित; मुंबईत बावनकुळेंशी चर्चा करणार
लक्ष्मण हाकेंचे आंदोलन स्थगित; मुंबईत बावनकुळेंशी चर्चा करणार
मोठी बातमी! राम मंदिरच्या नव्या CEO चे नाव जाहिर; थेट सेनेतील...
मोठी बातमी! राम मंदिरच्या नव्या CEO चे नाव जाहिर; थेट सेनेतील निवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका
ठाकरे गटाला मोठा धक्का? कोर्टाने याचिका फेटाळली; विशाखा राऊत नगरसेविका पद...
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा..
शिवसेना पक्ष चिन्हाबाबतची आजची सुनावणी संपली; शिंदे गटाच्या वकिलांचा नेमका युक्तिवाद काय?