
अभिषेक शर्माने आशिया कप 2025 स्पर्धा गाजवली. तो मैदानात असेपर्यंत प्रतिस्पर्धी गोलंदाज आणि संघाला धाकधूक असायची. इतकी दहशत अभिषेक शर्माने अल्पावधीच तयार केली आहे. अभिषेक शर्मा आशिया कप स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार पटकावून मायदेशी परतला आहे. पण यावेळी त्याचं वेगळं रूप पाहायला मिळालं. कारण आता अभिषेक शर्मा त्याची बहीण कोमलच्या लग्नात व्यस्त झाला आहे. अभिषेक शर्माने क्रिकेट बाजूला ठेवून लग्नाच्या कार्यक्रमात सहभागी झाला आहे. कोमलच्या लग्नापूर्वीचे कार्यक्रम 30 सप्टेंबरपासून सुरु झाले आहे. या कार्यक्रमातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओत अभिषेक शर्मा होणारे भावोजी लविश ओबेरॉय यांच्यासोबत भांगडा करताना दिसला. पंजाबी गायक रणजीत बावासोबत स्टेज शेअर केला. अभिषेक शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ 30 सप्टेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमातील आहेत.
अभिषेक शर्माच्या बहिणीच्या शगुन कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू युवराज सिंग यानेही हजेरी लावली. अभिषेक शर्मा त्याचा भावी भावोजी, लविश ओबेरॉय यांनी काळ्या रंगातील कपडे परिधान केले होते. काळ्या रंगाच्या लूकमध्ये अभिषेक खूपच डॅशिंग दिसत होता. अभिषेक शर्माला दिलखुलासपणे नाचताना पाहून उपस्थितांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. कोमल आणि लोविस यांचे लग्न अमृतसरमधील गुरुद्वारात शीख विधींनुसार होईल. अभिषेक शर्माला कोमल आणि सानिया या दोन मोठ्या बहिणी आहेत. अभिषेक कुटुंबात सर्वात लहान आहे.
VIDEO | Moga, Punjab: Cricketer Abhishek Sharma celebrates his sister Komal Sharma’s wedding with bhangra after Asia Cup victory.
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/kcDaqzA4cu
— Press Trust of India (@PTI_News) October 1, 2025
आशिया कपमध्ये टीम इंडियाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्माला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरवण्यात आले. अभिषेकने आशिया कपच्या सात सामन्यांमध्ये 314 धावा केल्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. सात डावांमध्ये 44.85 च्या सरासरीने आणि 200 च्या स्ट्राईक रेटने 314 धावा केल्या. सुपर फोरच्या सर्व सामन्यांमध्ये 50+ धावा केल्या. यात पाकिस्तानविरुद्ध 74 धावांचा डावही समाविष्ट होता. अंतिम सामन्यात अभिषेक शर्माची बॅट हवी तशी चालली नाही. पण त्याच्या नावाची दहशत पाकिस्तानी गोलंदाजांच्या मनात घर करून होती.