
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हेडिंग्ले लीड्स येथे 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपला कॅप्टन हॅरी ब्रूक याचा फिल्डिंगचा निर्णय योग्य ठरवला. मॅथ्यू शॉर्ट आणि ट्रेव्हिस हेड या सलामी जोडीने 46 धावांची भागीदारी करत ठिकठाक सुरुवात करुन दिली. मात्र त्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियाला झटके देत बॅकफूटवर ढकललं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची स्थिती 5 बाद 151 अशी स्थिती झाली.
त्यानंतर आदिल रशीद ऑस्ट्रेलियाच्या डावातील 28 वी ओव्हर टाकायला आला. रशीदने दुसऱ्या बॉलवर अनुभवी ग्लेन मॅक्सवेल याला आऊट करत इतिहास रचला. ग्लेन मॅक्सवेल आदिलचा 200 वी शिकार ठरला. रशीद एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 विकेट्स घेणारा इंग्लंडचा एकूण तिसरा तर पहिला स्पिनर ठरला. तसेच रशीद वेगवान 200 विकेट्स पूर्ण करणारा तिसरा स्पिरनही ठरला आहे. रशीदने 136 व्या सामन्यात हा कारनामा केला आहे. रशीदने आतापर्यंत 135 एकदिवसीय सामन्यांमधील 129 डावांमध्ये 199 विकेट्स घेतल्या आहेत.
आदिल रशीदचा ‘डबल’ धमाका
Adil Rashid becomes the third fastest spinner to 200 ODI wickets 🤩 pic.twitter.com/a5W1332zJE
— Sky Sports Cricket (@SkyCricket) September 21, 2024
इंग्लंडकडून आदिल रशीद याच्याआधी फक्त दोघांनाच एकदिवसीय क्रिकेटमध्ये विकेट्सचं द्विशतक पूर्ण करता आलं आहे. यामध्ये जेम्स अँडरसन आणि डॅरेन गफ यांचा समावेश आहे. अँडरसनने 194 सामन्यांमध्ये 269 विकेट्स घेतल्या आहेत. तर गफ यांच्या नावावर 158 सामन्यांमध्ये 234 विकेट्सची नोंद आहे.
आदिल रशीदचं विकेट्सचं द्विशतक
🚨 2️⃣0️⃣0️⃣ ODI WICKETS 🚨
And incredible effort, Rash 👏 pic.twitter.com/qetuJZj36q
— England Cricket (@englandcricket) September 21, 2024
ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : मिचेल मार्श (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, ॲरॉन हार्डी, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : हॅरी ब्रूक (कर्णधार), फिलिप सॉल्ट, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी स्मिथ (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, ऑली स्टोन, मॅथ्यू पॉट्स आणि आदिल रशीद.