Rohit Sharma WTC Final : भारतीय क्रिकेटमध्ये नव्या राड्याची सुरुवात? सौरव गांगुलीचा रोहित शर्मावर हल्लाबोल

| Updated on: Jun 08, 2023 | 1:13 PM

Rohit Sharma WTC Final : सौरव गांगुलीकडून रोहितच्या कॅप्टनशिप कौशल्यावर प्रश्नचिन्ह. सौरव गांगुलीने दाखवल्या रोहित शर्माच्या चूका. पहिल्या दिवशीच टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाने बॅकफूटवर ढकललय.

Rohit Sharma WTC Final : भारतीय क्रिकेटमध्ये नव्या राड्याची सुरुवात? सौरव गांगुलीचा रोहित शर्मावर हल्लाबोल
sourav ganguly statement on rohit sharma captaincy
Image Credit source: PTI
Follow us on

लंडन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या पहिल्या दिवशीच ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला बॅकफूटवर ढकललय. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने 3 विकेट गमावून 327 धावा केल्या. ट्रेविस हेडने शानदार शतक झळकावलं. स्टीव्ह स्मिथ शतकापासून 5 धावा दूर आहे. खराब कामगिरीमुळे टीम इंडियावर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला सुरुवात झालीआहे. माजी कर्णधार सौरव गांगुलीने रोहित शर्माच्या कॅप्टनशिपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय.

सौरव गांगुलीने स्टार स्पोर्ट्सवर बोलताना रोहितच्या कॅप्टनशिपबद्दल काही मुद्दे उपस्थित केले. रोहितने सौरव गांगुलीच्या टीकेला उत्तर दिलं, तर पुढच्या काही दिवसात भारतीय क्रिकेटमध्ये नवीन राड्याची सुरुवात होऊ शकते.

ऑस्ट्रेलियाला ड्रायव्हिंग सीटवर कोणी बसवलं?

रोहित शर्माने कसोटीच्या पहिल्या दिवशी जी, फील्ड प्लेसमेंट केली होती, त्यावर सौरव गांगुलीने प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. सौरवच्या मते रोहितने चुकीची फिल्ड प्लेस केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला आरामात धावा मिळाल्या. गांगुलीने सांगितलं की, एकवेळ ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 बाद 76 होती. त्यावेळी रोहितने अशा पद्धतीने फिल्डिंग लावली की, ऑस्ट्रेलियाला सहज धावा मिळाल्या. स्टीव स्मिथ आणि ट्रेविस हेडने स्ट्राइक रोटेट केलं. परिणामी ऑस्ट्रेलिया आता ड्रायव्हिंग सीटवर आहे.

शार्दुल ठाकूरवरही प्रश्नचिन्ह

सौरव गांगुलीने शार्दुल ठाकूरवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं. गांगुलीने शार्दुलच्या बॉलिंगची लेंग्थ आणि धावा देण्यावर कमेंट केली. जर मी टीम इंडियाचा कॅप्टन असतो, तर शार्दुलला सांगितलं असतं की, “तुला विकेट घ्यायच्या नाहीयत. फक्त 20 ओव्हर्समध्ये 40 धावा दे”


शार्दुलचा इकॉनमी रेट काय?

ओव्हलच्या मैदानात शार्दुलने 18 ओव्हरमध्ये 75 धावा देत एक विकेट काढला. त्याचा इकॉनमी रेट 4.20 रन्स प्रतिओव्हर होता. टेस्टच्या दृष्टीने हे रेट जास्त आहे. मोहम्मद शमीने सुद्धा प्रतिओव्हर चार धावा दिल्या. उमेश यादवची सुद्धा हीच स्थिती होती. परिणामी ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवस अखेर 3 बाद 327 धावा केल्या.