AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunil Gavaskar: त्याला अगोदर हाकला रे! कुणावर भडकले सुनील गावस्कर, महागड्या खेळाडूची वाढली डोकेदुखी

Sunil Gavaskar on Kolkata Knight Riders: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर हे कोलकत्ता नाईड रायडर्सच्या या खेळाडूवर चांगलेच भडकले. त्यांनी अगोदर या खेळाडूला संघाच्या बाहेर घालवा असा सल्ला दिल्याने खळबळ उडाली आहे. अजिंक्य रहाणे, वसीम जाफर नंतर कुणावर त्यांनी संताप व्यक्त केला?

Sunil Gavaskar: त्याला अगोदर हाकला रे! कुणावर भडकले सुनील गावस्कर, महागड्या खेळाडूची वाढली डोकेदुखी
सुनील गावस्कर
| Updated on: Apr 04, 2026 | 4:24 PM
Share

Sunil Gavaskar on Cameron Green : IPL 2026 मध्ये कोलकत्ता नाईट रायडर्सचा (KKR) अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याची कामगिरी थंडावली आहे. त्याची क्रिकेट विश्वात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने अतिरिक्त ताण व्यवस्थापनातंर्गत त्याला गोलंदाजी करण्यास मज्जाव केला आहे. त्याचा परिणाम कोलकत्ता नाईट रायडर्सच्या (KKR) संघावर स्पष्टपणे दिसत आहे. त्यावर माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी त्यांची नाराजी जाहीर केली आहे.

सर्वात महागड्या खेळाडूवर तोंडसुख

कोलकत्ता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे, माजी गोलंदाज वसीम जाफर यांच्याविरोधात याअगोदरच सुनील गावस्कर यांची तोफ धडाडली आहे. आता त्यांनी कॅमरून ग्रीनविरोधात मोर्चा उघडला आहे. त्याच्या जागी नवीन आणि उमद्या खेळाडूला घेण्याचा सल्ला त्यांनी केकेआरला दिला आहे. कोलकत्ता नाईट रायडर्सने लिलावात कॅमरून ग्रीन याला 25.20 कोटी रुपयात खरेदी केले होते. पण सुरुवातीच्या सामन्यात त्याने गोलंदाजी केली नाही. मग इतका महागडा खेळाडू खरेदी करून संघाला फायदा तरी काय झाला असा सवाल गावस्कर यांनी केला आहे.

स्फोटक वक्तव्याने खळबळ

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या मते कॅमेरून ग्रीन हा पाठीच्या दुखण्यातून आता सावरत आहे. त्यामुळे आयपीएलच्या या हंगामातील सुरुवातीच्या 10 ते 12 दिवस त्याने गोलंदाजी करणे योग्य होणार नाही. हाच धागा पकडून सुनील गावस्कर यांनी केकेआर संघ व्यवस्थापनाला सल्ला दिला आहे. जोपर्यंत कॅमेरून या दुखण्यातून सावरत नाही, तोपर्यंत त्याच्याऐवजी उमद्या खेळाडूला संधी द्यावी आणि संघाची ढासळती बाजू सावरावी असे गावस्कर यांनी सुचवले आहे. कॅमेरून ग्रीन हा चांगला फलंदाज आहे. पण अजून त्याला सूर गवसला नाही.

दोन सामन्यात अवघ्या 20 धावा

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानुसार, कॅमेरून ग्रीन पाठीच्या दुखण्यातून लवकरच बाहेर येईल. पण तोपर्यंत तो तीन ते चार सामन्यात तो गोलंदाजी करू शकत नाही. अर्थात ग्रीन हा नेट प्रॅक्टिसमध्ये गोलंदाजी करताना दिसला आहे. त्यामुळे तो लवकरच मैदानात अष्टपैलू कामगिरी दाखवले असे केकेआरला वाटते. सध्याचे त्याला कामगिरीची छाप सोडता आलेली नाही. त्याने मुंबईविरोधात केवळ 18 धावा आणि सनराइजर्स हैदराबादविरोधात 2 धावा केल्या आहेत.

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून.....
मोठी बातमी! ठाकरेंवरील टीका भोवली; सदावर्तेंच्या गाडीवर मनसेकडून......
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात
निदा खानला फरार असताना कोणी कोणी मदत केली? SIT कडून चौकशीला सुरुवात.
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप...
निदा खान प्रकरणावर ओवैसींचे मोठे विधान, म्हणाले, तिच्यावरील आरोप....
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले, लवांडेंचा समर्थकांकाडून दुग्धाभिषेक.
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं
FIR दाखल होण्याआधीच निदाचं ट्रान्सफर अन्... एमआयएम नेते ओवेसी नेमकं.
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ
संग्राम भंडारेंच्या गुंडांनी रिव्हॉल्व्हर दाखवत... विकास लवांडेंनी काळ.
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे
राज्यासमोर नवं संकट उभं? बँकेत पैशांचा पुरवठा कमी... 'कॅश' टंचाईमुळे.
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली
काळ आला होता पण वेळ आली नव्हती;रेल्वे समोर आली अन् महिला ट्रॅकवर झोपली.
इम्तियाज जलील यांनी निदा खानला घर देण्यासाठी... नाशिक धर्मांतरण
इम्तियाज जलील यांनी निदा खानला घर देण्यासाठी... नाशिक धर्मांतरण.
डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधाने नाही? घरात काय.....
डोकाडिया कुटुंबाचा मृत्यू उंदीर मारण्याच्या औषधाने नाही? घरात काय......