काहीही म्हणा…! रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाला आता ऋषभ पंतकडून अपेक्षा, का ते जाणून घ्या

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीसाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. त्यामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाची अग्निपरीक्षा असणार आहे. 20 जूनपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.

काहीही म्हणा...! रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाला आता ऋषभ पंतकडून अपेक्षा, का ते जाणून घ्या
रोहित-विराटच्या निवृत्तीनंतर टीम इंडियाला आता ऋषभ पंतकडून अपेक्षा
Image Credit source: Darrian Traynor/Getty Images
| Updated on: Jun 11, 2025 | 8:26 PM

भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहे. विराट कोहली आणि रोहित शर्माच्या नेतृत्वात इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाचा कस लागणार आहे. या संघात आर अश्विन देखील नसल्याने अनुभवाची उणीव जाणवणार आहे. रोहित शर्मानंतर कसोटी संघाची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर सोपवली आहे. भारतीय संघ इंग्लंडमध्ये इतिहास रचण्यासाठी घाम गाळत आहे. पण संघातील अनुभवी खेळाडूंची उणीव पाहता हा दौरा कठीण असणार आहे हे मात्र नक्की.. त्यामुळे विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतकडून अपेक्षा वाढल्या आहेत. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहलीनंतर ऋषभ पंत हा एकमेव खेळाडू आहे, ज्याने विदेशी भूमीवर खोऱ्याने धावा केल्या आहेत. ऋषभ पंतच्या फॉर्मची चिंता गेल्या काही दिवसांपासून होती. पण आयपीएल 2025 मधील साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात शतक ठोकत फॉर्मात आल्याचं दाखवून दिलं. या फॉर्मसह तो इंग्लंडमध्ये कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. इतकंच काय तर धोनीचा रेकॉर्डही रडारवर असणार आहे.

ऋषभ पंतने SENA (दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) या देशांविरुद्ध 2021 पासून आतापर्यंत 1 हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहे. यात दोन शतकं आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. यात त्याने सर्वाधिक धावा या ऑस्ट्रेलियाविरुद्ध केल्या आहेत. पंतने ऑस्ट्रेलियात 2018 पासून 12 कसोटी सामने खेळले आहेत. यात 46.26 च्या सरासरीने 879 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्ध 9 कसोटी सामन्यात त्याने 556 धावा केल्या. न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्ध फार कसोटी खेळला नाही. पण दोन्ही ठिकाणी चांगली कामगिरी केली आहे.

पंतकडे धोनीचा रेकॉर्ड मोडण्याची संधी

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतकडे महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. पंत कसोटीत इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत महेंद्रसिंह धोनीला मागे टाकू शकतो. धोनीला मागे टाकण्यासाठी 222 धावांची गरज आहे. धोनीने 23 डावात 778 धावा केल्या आहे. इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विदेशी विकेटकीपरच्या यादीत धोनी पहिल्या स्थानावर आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या रोड मार्शचा क्रमांक लागतो. त्याने 35 डावात 773 धावा केल्या आहेत. तर पंत या यादीत सातव्या स्थानावर आहे.