वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवानंतर टीम इंडियाचा एल्गार! अक्षर पटेल स्पष्टच म्हणाला की…

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अंतिम सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाच्या गोटात निराशेचं वातावरण आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी तरुण खेळाडूंसह टीम इंडिया पुन्हा सज्ज झाली आहे. अक्षर पटेल या संघात असून त्याने टीम इंडिया पराभवातून शिकत पुढे जाईल, असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवानंतर टीम इंडियाचा एल्गार! अक्षर पटेल स्पष्टच म्हणाला की...
"आम्ही पुन्हा एकदा..", वनडे वर्ल्डकप पराभवानंतर अक्षर पटेलने सांगितलं की..
| Updated on: Nov 23, 2023 | 3:49 PM

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवाची सळ अजून काही संपलेली नाही. हातातोंडाशी आलेला घास ऑस्ट्रेलियाने हिरावून नेला. त्यमुळे टीम इंडियामध्ये निराशेचं वातावरण आहे. टीम इंडियाचे खेळाडू ओक्साबोक्शी रडले. काहींनी मैदानात अश्रूंना मोकळी वाट करून दिली. तर काहींनी अश्रू लपवत थेट ड्रेसिंग रुम गाठत अश्रू गाळले. आता या पराभवातून सावरण्याची वेळ आली आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. यासाठी संघाची घोषणा करण्यात आली असून नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. तर वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दुखापतीमुळे बाहेर पडलेल्या अक्षर पटेल यालाही संधी मिळाली आहे. टी20 मालिकेपासून टीम इंडियाचे खेळाडू पुन्हा एकदा आपली ताकद सिद्ध करून देण्यासाठी सज्ज झाले आहेत. या मालिकेतून तरुण खेळाडूंना आपली ताकद सिद्ध करण्यास मदत होणार आहे.

“प्रत्येकला वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पराभवाचं दु:ख आहे. पण आता वेळ यातून सावरत पुढे जाण्याची आहे. आम्ही आता यंग टीम आहोत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 मालिका खेळणार आहेत. आम्ही सर्व जण काय आहोत हे सिद्ध करून दाखवणार आहोत. संघातील खेळाडूंमध्ये प्रचंड एनर्जी आहे.” असं अक्षर पटेल याने जिओ सिनेमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

“टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आम्ही 10-11 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहोत. त्यामुळे आम्ही या स्पर्धेपूर्वी नक्कीच छाप पाडू. आम्ही सर्व आमच्या स्ट्रेंथनुसार खेळणार आहोत. नवीन कीह करण्याची गरज नाही. पुढे जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू. ऑस्ट्रेलियाचा संघ तगडा असून त्यांच्यासोबत पाच सामने खेळायचे आहेत. त्यामुळे कोणत्याही दबावाखाली आम्ही खेळणार नाही. आम्ही खेळाचा पुरेपूर आनंद घेऊ.”, असं अक्षर पटेल म्हणाला.

“माझ्या डोक्यात सर्वकाही तसंच सुरु आहे. वनडे वर्ल्डकपपूर्वी होतं अगदी तसंच..दुखापतीतून सावरल्यानंतर मी पुन्हा एकदा सज्ज झालो आहे. त्यामुळे माझ्या खेळात मी कोणताही बदल करणार नाही. या संघात मी आता एक वरिष्ठ खेळाडू आहे. त्यामुळे जखमी होण्यापूर्वी मी जसा क्रिकेट खेळत होतो. त्यात काही बदल होणार नाही.”, असंही अक्षर पटेल याने पुढे सांगितलं.