Ashes 1st Test Day 5 | इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना रंगतदार स्थितीत

England vs Australia 1st test | अ‍ॅशेस मालिकेतील पहिला कसोटी सामन्याच्या निकालावर टीम इंडियाचं भवितव्य अवलंबून आहे.

Ashes 1st Test Day 5 | इंग्लंड  विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला कसोटी सामना रंगतदार स्थितीत
| Updated on: Jun 20, 2023 | 2:41 PM

बर्मिंगघम | अ‍ॅशेस सीरिजमधील पहिला कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 281 धावांचे आव्हान दिलं होतं.ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवसाचा खेळसंपेपर्यंत 30 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 107 धावा केल्या. उस्मान ख्वाजा 34 आणि स्कॉट बॉलँड 13 धावांवर नाबाद आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पाचव्या दिवशी विजयासाठी आणखी 173 धावांची गरज आहे. या सामन्याच्या निकालावर टीम इंडियाचं भवितव्य अवलंबून आहे.

पहिला कसोटी सामना कोण जिंकणार?

टीम इंडिया ताज्या आकडेवारीनुसार आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. टीम इंडियाच्या नावावर एकूण 121 रेटिंग पॉइंट्स आहेत. मात्र ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत केलं. त्यामुळे साहजिक आहे की ऑस्ट्रेलियाचे पॉइंट्स वाढणार. अजूनही आयसीसी टेस्ट टीम रँकिंग अपडेट झालेली नाही.

त्यामुळे आता जेव्हा टेस्ट रँकिंग अपडेट होईल, तेव्हा टीम इंडियाच्या रेटिंग पॉइंट्समध्ये 2 ने घट झालेली असेल. यामुळे टीम इंडियाने रेटिंग्स पॉइंट्स 121 वरुन 119 इतके होतील. तर ऑस्ट्रेलियाचे रेटिंग पॉइंट्स 119 होईल. मात्र काही पॉइंट्सच्या फरकाने अव्वल स्थानी कोण हे लवकरच स्पष्ट होईल.

तर आता अ‍ॅशेस सीरिजमधील पहिला सामना हा निकाली निघणार असल्याचं स्पष्ट आहे. ऑस्ट्रेलियाला विजायासाठी 174 धावा आणि इंग्लंडला विजयासाठी 7 विकेट्सची गरज आहे. ऑस्ट्रेलिया सामना जिंकली तर टीम इंडियाचं अव्वल स्थान गेल्यात जमा आहे. मात्र इंग्लंड सामना जिंकल्यास टीम इंडियाचं अव्वल स्थान आणखी काही दिवस कायम राहिल. त्यामुळे आता या सामन्याच्या निकालाकडेही टीम इंडियाचं लक्ष असणार आहे.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), नॅथन लियॉन, जोश हेझलवूड आणि स्कॉट बोलँड.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), बेन डकेट, झॅक क्रॉली, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ऑली रॉबिन्सन आणि जेम्स अँडरसन.