IND vs PAK : धोनीच्या पंटरकडून पाकिस्तानचा भरमैदानात ‘पंच’नामा, कुलदीपकडून 35 वर्षांनंतर रेकॉर्ड ब्रेक!

Kuldeep Yadav Record Breack : चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने पाच विकेट घेत पाकिस्तानचा अर्धा संघ माघारी पाठवला. या कामगिरीसह यादवने 35 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

IND vs PAK : धोनीच्या पंटरकडून पाकिस्तानचा भरमैदानात पंचनामा, कुलदीपकडून 35 वर्षांनंतर रेकॉर्ड ब्रेक!
कुलदीप यादव – 88 सामने , अब्दुल रज्जाक – 108 सामने , ब्रॅड हॉग – 118 सामने , शकिब अल हसन – 119 सामने , रवींद्र जडेजा – 129 सामने अशी यादी आहे.
| Updated on: Sep 12, 2023 | 9:57 AM

मुंबई  : आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तान संघाचा पराभव केला आहे. दोन दिवस चाललेल्या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानला सहज मात दिली. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांची अर्धशतके आणि विराट कोहली आणि के. एल. राहुल यांच्या शतकांच्या जोरावर भारताने पाकिस्तानला 357 धावांचं डोंगराएवढं लक्ष्य दिलं होतं. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा डाव 128 धावांवर आटोपला. या सामन्यामध्ये चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने पाच विकेट घेत पाकिस्तानचा अर्धा संघ माघारी पाठवला. या कामगिरीसह यादवने 35 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

35 वर्षांचा कोणता रेकॉर्ड?

पाकिस्तानविरूद्ध एका सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याची कामगिरी कुलदीप यादवने केली आहे. 1988 साली अर्शद अयुबने ढाकामध्ये भारताच्या 5 विकेट्स 21 धावांमध्ये घेतल्या होत्या. त्यानंतर कुलदीप यादवने आता 25 धावा देत 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरने 2005 साली 50 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर अनिल कुंबळेने टोरोंटोमध्ये 12 धावा घेत 4 विकेट घेतल्या होत्या.

सामन्याचा धावता आढावा-:

भारताने प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा 56 धावा, शुबमन गिल 58 धावा, विराट कोहली 122 धावा आणि के. एल. राहुल 111 धावा केल्या होत्या. चौघांनीही पाकिस्तानच्या बॉलर्सला चोपून काढत भारताला 350 धावांचा टप्पा पार करून दिला होता. पाकिस्तान संघाल या आव्हानाचा पाठलाग करताना 128 धावा करता आल्या. दोन खेळाडू दुखापती असल्याने ते खेळायला मैदानात उतरले नाहीत.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, इशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), फखर जमान, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हरिस रॉफ.