
मुंबई : एशियन गेम्स 2023 मध्ये महिला भारतीय संघाने सेमी फायनल सामन्यात बांगलादेश संघाचा 8 विकेट्सने पराभव केलेला आहे. या विजयासह महिला भारतीय महिला संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताची अष्टपैलू खेळाडू पूजा वस्त्राहरकरच्या भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या फलंदाजांनी नांगी टाकली. बांगलादेश संघाला अवघ्या 51 धावांवर गुंडाळलं होतं, भारतीय संघाने 2 विकेट्स गमावत हे लक्ष्य 9 व्या ओव्हरमध्ये पूर्ण केलं.
बांगलादेश संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पूजा वस्त्राहरकर हिने बांगलादेशच्या सर्वाधिक चार विकेट्स घेत फलंदाजीला सुरूंग लावला. बांगलादेश संघाच्या 5 खेळाडूंना आपलं खातंही उघडता आलं नाही. भोपळा न फोडता आलेल्या खेळाडूंमध्ये सलामीवीर शमीमा सुलताना आणि शाठी राणी यांचाही समावेश असून दोघींना पूजाने माघारी पाठवलं.
बांगलादेश संघाकडून निगार सुलताना हिने सर्वाधिक 12 धावा केल्या. बाकी एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पूजा वस्त्राहकरने 4, देविका वैद्य 1, राजेश्वरी गायकवाड 1, अमनजोत कौर 1 आणि तीतस साधू यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
भारतीय संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरल्यावर स्मृती मानधना (7), शफाली वर्मा (17) धावांवर बाद झाल्या. जेमिमाह रॉड्रिग्स नाबाद 20 धावा आणि कनिका आहुजा नाबाद 1 खेळत भारताच्या विजयावर शिक्कमोर्तब केलं. या विजयासह फायनलमध्ये प्रवेश करत भारताने आपलं पदक पक्क केलं आहे.
बांगलादेश संघ (प्लेइंग इलेव्हन): शमीमा सुलताना, शाठी राणी, निगार सुलताना (w/c), शोभना मोस्तारी, रितू मोनी, मारुफा अक्टर, नाहिदा अक्टर, शोर्ना अक्टर, फहिमा खातून, सुलताना खातून, राबेया खान
भारतीय संघ (प्लेइंग इलेव्हन): स्मृती मानधना (C), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, कनिका आहुजा, रिचा घोष (W), दीप्ती शर्मा, देविका वैद्य, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, तीतस साधू, राजेश्वरी गायकवाड