IND vs AUS : अरे यांना जमतच नाही, भारत-ऑस्ट्रेलिया दोघांमधील धक्कादायक आकडेवारी समोर
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड कपआधी दुसरी वन डे मालिका होणार आहे. या मालिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याआधी मालिकेतील शेवटच्या पाच सामन्यांची आकडेवारी पाहिली तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. कारण या आकडेवारीमध्ये कांगारूंचं पारडं जड दिसत आहे.
Follow us
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील शेवटच्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारताचा 21 धावांनी पराभव झाला होता. हा सामना चेन्नईमधील चेपॉक स्टेडिअमवर पार पडलेला.
तीन दिवसांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाचा तब्बल 10 विकेट्सने पराभव झालेला पाहायला मिळाला होता. हा सामना 19 मार्च 2023 दिवशी झाला होता.
याच मालिकेतील पहिला सामना 17 मार्च 2023 रोजी पार पडला होता. या सामन्यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवला होता. मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर झालेला आणि हा सामना भारताने 5 विकेट्स जिंकला होता.
2 डिसेंबर 2020 मध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारतीय संघाने 13 धावांनीा विजय मिळवलेला. कॅनबेरा येथे हा सामना पार पडला होता.
या मालिकेवेळी दुसऱ्या सामन्यामध्ये दोन्ही संघ सिडनीमध्ये 29 नोव्हेंबर 2020 भिडले होते. त्या सामन्यामध्ये भारतीय संघाने विजय मिळवला होता.