काय बॉल टाकला राव, पाकिस्तानात वेगाचा नवीन बादशाह, थेट मिडल स्टम्पसचे दोन तुकडे, पहा VIDEO

| Updated on: Sep 20, 2022 | 1:33 PM

त्याची बॉलिंग पाहून काही वेळासाठी शाहीन शाह आफ्रिदी, नसीम शाहला सुद्धा विसरालं

काय बॉल टाकला राव, पाकिस्तानात वेगाचा नवीन बादशाह, थेट मिडल स्टम्पसचे दोन तुकडे, पहा VIDEO
pakistan cricket
Image Credit source: VideoGrab
Follow us on

मुंबई: पाकिस्तानला शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाहच खूप कौतुक आहे. पाकिस्तानचे क्रिकेट एक्सपर्ट्स या दोन वेगवान गोलंदाजांच सतत कौतुक करत असतात. पण आता पाकिस्तानच्याच आसिफ महमूदची गोलंदाजी पाहून हे एक्सपर्ट्स विचारात पडतील. त्याच्या गोलंदाजीचा वेग पाहून हैराण होतील. पाकिस्तानी क्रिकेट फॅन्स आसिफ महमूदची गोलंदाजी पाहून शाहीन आणि नसीमला विसरतील.

फायनलमध्ये गोलंदाजीची भेदकता दिसून आली

आसिफ महमूद फक्त विकेटच घेत नाही, तर स्टम्पसही मोडतो. नॅशनल टी 20 कपच्या फायनलमध्ये त्याच्या गोलंदाजीची भेदकता दिसून आली. आसिफ महमूदच्या चेंडूवर मिडल स्टम्पसचे दोन तुकडे झाले.

शेवटची ओव्हर टाकत होता

नॅशनल टी 20 कपच्या फायनलमध्ये सिंधचा सामना खैबर पख्त्नख्वाह विरुद्ध सुरु होता. आसिफ महमूद सिंधचा गोलंदाज आहे. खैबरची टीम फलंदाजी करत होती. आसिफ इनिंगमधील शेवटची ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर आसिफला फलंदाजाने षटकार लगावला. या सिक्सनंतर आसिफने जे केलं, त्याची चर्चा सुरु आहे.

नुसतं बोल्ड नाही, तर दोन तुकडे केले

आसिफने चौथ्या चेंडूवर समोरच्या फलंदाजाला फक्त बोल्ड केलं नाही, तर स्टम्पचे दोन तुकडे केले. आसिफने ही विकेट काढून खैबरचा डावही संपवला. आसिफ महमूदचा मॅचमधला हा दुसरा विकेट होता. त्याने फायनलमध्ये 3.5 ओव्हर गोलंदाजी केली. त्याने 35 धावा देऊन 2 विकेट काढल्या.

आधी HATTRICK घेतली होती

आसिफ महमदू तो विकेट काढण्याआधी सुद्धा चर्चेत आला होता. त्याने नॅशनल टी 20 कपमध्ये पहिली HATTRICK घेतली होती. खैबरच्या टीम विरोधातच त्याने ही कामगिरी केली होती.