AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs IND 1st Odi : ऑस्ट्रेलिया-इंडिया पहिल्या सामन्याला भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरुवात होणार? जाणून घ्या

Australia vs India 1st Odi Live Streaming : रविवार 19 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया वनडे सीरिजचा थरार रंगणार आहे. भारतीय संघ या मलिकेत विजयी सुरुवात करणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

AUS vs IND 1st Odi : ऑस्ट्रेलिया-इंडिया पहिल्या सामन्याला भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरुवात होणार? जाणून घ्या
Mitchell Marsh and Shubman Gill AUS vs IND Odi Series 2025Image Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Oct 18, 2025 | 3:43 PM
Share

भारतीय क्रिकेट चाहत्यांची ऑस्ट्रेलिया दौऱ्याची प्रतिक्षा अवघ्या काही तासांनी संपणार आहे. चाहत्यांनी आशिया कप 2025 स्पर्धेनिमित्ताने टी 20i सीरिजचा थरार अनुभवला. त्यानंतर भारताने विंडीजचा कसोटी क्रिकेटमध्ये 2-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. त्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. या मालिकेतून शुबमन गिल एकदिवसीय कर्णधार म्हणून नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे.तसेच पॅट कमिन्स याच्या अनुपस्थितीत मिचेल मार्श ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. पहिला सामना कुठे होणार हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना केव्हा?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना रविवारी 19 ऑक्टोबरला होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना पर्थ स्टेडियममध्ये होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिल्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिल्या सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता सुरुवात होईल. तर 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया पहिला सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहता येईल.

टीम इंडिया विजयी सुरुवात करणार का?

बीसीसीआय निवड समितीने काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. बीसीसीआयने यासह भारताच्या एकदिवसीय संघाच्या नव्या कर्णधाराच्या नावाची घोषणा केली. बीसीसीआयने शुबमन गिल याला कर्णधार केलं.

शुबमनने इंग्लंड दौऱ्यातून कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण केलं. शुबमनने त्या दौऱ्यात कॅप्टन आणि बॅट्समन या दोन्ही भूमिका चोखपणे पार पाडल्या. शुबमनने आपल्या नेतृत्वात 5 सामन्यांची मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. तसेच शुबमनने 700 पेक्षा अधिक धावाही केल्या. आता शुबमन ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून कॅप्टन म्हणून मैदनात उतरणार आहे. त्यामुळे शुबमनसमोर भारताला विजयी करण्याचं आव्हान असणार आहे. शुबमन या मालिकेत कॅप्टन म्हणून कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

मार्नस लाबुशेनचा समावेश

दरम्यान ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर कॅमरुन ग्रीन याला दुखापतीमुळे एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे ग्रीनच्या जागी ऑस्ट्रेलिया संघात कॅमरुन ग्रीन याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे लबुशेन टीम इंडिया विरुद्ध कॅमरुनची उणीव भरुन काढणार का? याकडे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाचं लक्ष असणार आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?