AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohammad Siraj : ये उठ चल बॅटींगला ये…. झोपलेल्या लाबूशेनला सिराजने बिथरवलं, पाहा नेमकं काय झालं!

डेव्हिड वॉर्नर याला माघारी पाठवत सिराजने संघाला यश मिळवून दिलं. त्यावेळी मार्नस लाबुशेन मस्त झोपला होता.

Mohammad Siraj : ये उठ चल बॅटींगला ये.... झोपलेल्या लाबूशेनला सिराजने बिथरवलं, पाहा नेमकं काय झालं!
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jun 11, 2023 | 5:27 PM
Share

मुंबई :  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल 2023 सामन्यात अजिंक्य रहाणेसोबत मोहम्मद सिराजने कांगारूंना धक्के दिले. टीम इंडियाचा डाव 296 धावांवर आटोपला, त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या कांगारूंना पहिला धक्का देत सिराजने सामन्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. डेव्हिड वॉर्नर याला माघारी पाठवत सिराजने संघाला यश मिळवून दिलं. त्यावेळी मार्नस लाबुशेन मस्त झोपला होता.

कॅमेरा त्याच्याकडे गेल्यावर तो मस्त आरामात झोपलेला दिसत होता. मात्र सिराजने तिला ही झोप फार काही वेळ घेऊ दिली नाही. कारण चौथ्या ओव्हरमध्ये त्याने डेव्हिड वॉर्नरला आऊट केलं. मग काय कॅमेरा परत एकदा लाबूशेनकडे दाखवण्यात आला. डेव्हिड वॉर्नर आणि ख्वाजा जास्त वेळ खेळतील असं वाटत होतं. मात्र सिराजने त्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं.

मार्नस लाबुशेन वन डाऊन खेळायला येतो, तो पॅडअप होऊन बसला होता पण विकेट पडल्यावर त्याची झालेली तारांबळ पाहायला मिळाली. या दरम्यानचा दोघांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडीओ –

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी दोन्ही टीम

WTC Final साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, केएस भरत, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

राखीव खेळाडू | सूर्यकुमार यादव, यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार

WTC Final साठी टीम ऑस्ट्रेलिया | पॅट कमिन्स (कॅप्टन), स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, मायकेल नेसर, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मिचेल स्टार्क आणि मॅथ्यू रेनशॉ.

राखीव खेळाडू | मिचल मार्श आणि मॅथ्यू रेनशॉ.

Follow Us
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध...
लालबागच्या राजाच्या दर्शनाचे कव्हरेज करताना पत्रकारांना अडवले; वैध पास असूनही पोलिसांची अडवणूक
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार
मरण पत्करेन, पण सरकारला शरण जाणार नाही; मनोज जरांगे पाटील यांचा एल्गार, मुंबईला रवाना
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर भोजन...
महायुतीच्या नेत्यांसाठी फडणवीसांचा खास नियोजन! वर्षा बंगल्यावर स्नेहभोजन अन् बाप्पाचे दर्शन
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह...
सुनेत्रा पवार आज ‘वर्षा’वर बाप्पाच्या दर्शनाला; NCP आमदारांसह संध्याकाळी ७ वाजता उपस्थिती
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील नेत्याची मोठी प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
दिशा सालियान प्रकरणात मोठा ट्विस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरे...
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणात नवा ट्वीस्ट? CBI च्या FIR मध्ये ठाकरेंचं नाव नाहीच...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णायक सुनावणी? शिंदेंचे वकील करणार...
शिवसेना कुणाची? आज कोर्टात निर्णयाक सुनावणी... शिंदेंचे वकिल करणार युक्तिवाद
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप