IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 352 धावांचं मोठं आव्हान, टीम इंडियाच्या फलंदाजीकडे लक्ष

IND vs AUS 3rd ODI 2023 : तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर 352 धावांचं आव्हान दिलं आहे. डेविड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मिचेल मार्श आणि मार्नस लाबुशेन यांनी अर्धशतकी खेळी केली. आता भारताच्या फलंदाजीकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 352 धावांचं मोठं आव्हान, टीम इंडियाच्या फलंदाजीकडे लक्ष
IND vs AUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाने रचला धावांचा डोंगर, टीम इंडिया आव्हान गाठणार का?
Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Sep 27, 2023 | 5:31 PM

मुंबई: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 50 षटकात 7 गडी गमवून 352 धावा केल्या आणि विजयासाठी 353 धावांचं दिलं आहे. पाटा पिच असल्याने फलंदाजीसाठी पूरक आहे. ऑस्ट्रेलियाच्या सलामीच्या डेविड वॉर्नर आणि मिशेल मार्श जोडीने आक्रमक सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी 78 धावांची भागीदारी केली. जोडी जमली असताना प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारण्याच्या डेविड वॉर्नर बाद झाला. त्यानं 34 चेंडूत 56 धावांची भागीदारी केली. यात 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे.

मिचेल मार्श आणि स्टीव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या गड्यासाठी 137 धावांची भागीदारी केली. मिचेल मार्श याने जबरदस्त खेळी केली. मात्र शतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. 96 धावांवर असताना कुलदीप यादव याच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला आणि प्रसिद्ध कृष्णाच्या झेल देऊन बाद झाला.स्टिव्ह स्मिथही पाटा पिचवर चांगल्या रंगात आला होता. पण मोहम्मद सिराजने त्याला पायचीत करत तंबूत पाठवलं. 61 चेंडूत 74 धावा केल्या. यात 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

एलेक्स कॅरेच्या रुपाने ऑस्ट्रेलिया चौथा धक्का बसला. बुमराहच्या गोलंदाजीवर एलेक्स कॅरेने त्याचा झेल घेतला. त्याने 19 चेंडूत 11 धावा केल्या.ग्लेन मॅक्सवेलही काही खास करू शकला नाही. बुमराहने ग्लेन मॅक्सवेलला त्रिफळाचीत केलं. तर कुलदीप यादवने कॅमरोन ग्रीनला अवघ्या 9 धावांवर तंबूत पाठवलं. मार्नस लाबुशेन 72 धावांवर असताना बुमराहने त्याला तंबूत धाडलं.  जसप्रीत बुमराह याने 3 गडी, प्रसिद्ध कृष्णाने 2, मोहम्मद सिराज 1, रवींद्र जडेजा 1 आणि वॉशिंग्टन सुंदर 1 गडी बाद केला.

भारत-ऑस्ट्रेलिया संघांची प्लेइंग 11

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तनवीर संघा, जोश हेझलवूड

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्धा कृष्णा