गर्लफ्रेंडकडून मार खाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या माजी कॅप्टनला आता चप्पल, बूट बनवणाऱ्यांनी दिला झटका

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यासोबत काम करण्याचा कुठलाही इऱादा नाहीय, हे ऑस्ट्रेलियन ब्रांडने स्पष्ट केलय. आधी त्याच्या इमेजच नुकसान झालं. आता त्याचं कोट्यवधी रुपयांच नुकसान झालं.

गर्लफ्रेंडकडून मार खाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या माजी कॅप्टनला आता चप्पल, बूट बनवणाऱ्यांनी दिला झटका
फोनला उत्तर देत नव्हती म्हणून प्रेयसीवर अत्याचार
Image Credit source: Social Media
| Updated on: Jan 26, 2023 | 12:46 PM

मेलबर्न : गर्लफ्रेंडकडून मार खाणारा ऑस्ट्रेलियन कॅप्टन मायकल क्लार्कच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. आधी त्याच्या इमेजच नुकसान झालं. आता त्याचं कोट्यवधी रुपयांच नुकसान झालं. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मायकल क्लार्कचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात त्याची गर्लफ्रेंड जेड यारब्रॉने क्लार्कची चांगलीच धुलाई केली होती. यारब्रॉने त्याच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता बूट-चप्पल बनवणाऱ्या कंपनीने क्लार्क सोबतचा करार तोडला आहे. फुटवेअर आणि कपडे बनवणाऱ्या एका मोठ्या ब्रांडने क्लार्कपासून अंतर ठेवण्याचा निर्णय घेतलाय.

नवीन कॉन्ट्रॅक्ट करण्याचा कुठलाही विचार नाही

क्लार्कचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यासोबत काम करण्याचा कुठलाही इऱादा नाहीय, हे ऑस्ट्रेलियन ब्रांडने स्पष्ट केलय. क्लार्कसोबत नातं मागच्यावर्षी सुरु झालं होतं. मागच्यावर्षीच हे नातं संपलं. आता या वादानंतर क्लार्कसोबत नवीन कॉन्ट्रॅक्ट करण्याचा कुठलाही विचार नाहीय, असं ऑस्ट्रेलियाच्या या प्रसिद्ध ब्रांडने सांगितलय.

क्लार्कसोबत फक्त एकदाच काम केलं

या ब्रांडने क्लार्कसोबत फक्त एकदा काम केलय. कंपनीने मागच्यावर्षी सप्टेंबर महिन्यात फादर्स डेच्या सुरुवातीला शूट केलं होतं. पुन्हा भविष्यात क्लार्कसोबत काम करण्याचा इरादा नसल्याचं ब्रांडने सांगितलं. त्यामुळे भविष्यात मायकल क्लार्कसोबत कोट्यवधींची डील होण्याची शक्यता संपुष्टात आली आहे.

बीसीसीआय पाऊल उचलणार?

क्लार्कला भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीजच्या कॉमेंट्री पॅनलमधून सुद्धा बाहेर केलं जाऊ शकतं. माजी ऑस्ट्रेलियाई कॅप्टनसोबत बीसीसीआयने कॉमेंट्री पॅनलसाठी करार केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार बीसीसीआय क्लार्कला पॅनलवरुन हटवू शकते. असं झाल्यास क्लार्कचा 82 लाख रुपयांच नुकसान होऊ शकतं.

एक्स गर्लफ्रेंडसोबत भारतात येण्याची योजना

क्लार्क त्याच्या गर्लफ्रेंडसोबत सुट्टया एन्जॉय करण्यासाठी गेला होता. त्यावेळी गर्लफ्रेंडने क्लार्कवर आरोप केला. एक्स गर्लफ्रेंड पीप एडवर्ड्सला भेटून भारत दौऱ्यावर एकत्र जाण्याचा तुम्ही प्लानिंग करताय असा आरोप जेड यारब्रॉने केला. हा वाद भरस्त्यात झाला. त्यानंतर क्लार्कच्या अडचणी वाढल्या.