
बाबर आझमचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट एक काळ खूपच बोलबाला होता. पण मागच्या काही वर्षात त्याच्या कारकिर्दिला ग्रहण लागलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीत काही खास करू शकला नाही. तर न्यूझीलंड विरूद्धच्या वनडे मालिकेतही बॅट शांत राहिली. आता बाबर आझमचा फॉर्म कसा आहे याबाबत पाकिस्तान सुपर लीगमध्ये स्पष्ट कळेल. पण ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी कराची किंग्सचे मालक सलमान इकबाल एक मोठा खुलासा केला आहे. पीएसएल स्पर्धा सुरु असताना बाबर आझम रात्रीचा हॉटेल सोडून बाहेर जायचा आणि त्याला कोणी थांबवलं देखील नाही. सलमान इकबालने एका मुलाखतीत सांगितलं की, ‘बाबर आझम रात्री उशिरा हॉटेलमधून बाहेर जायचा आणि त्याला कोणीही थांबवत नव्हतं. तो आपल्या इतर सहकाऱ्यांनाही घेऊन जायचा.’
बाबर आझम रात्रीच्या वेळेत हॉटेलबाहेर का जायचा? त्या मागचं कारण काय? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील, तर त्याचं उत्तरही पुढे दिलं आहे. सलमान इकबाल यांनी सांगितलं की, ‘बाबर आझमला लोकल फूड खाणं आवडतं. आम्ही बाबरला कधीच कराही खाण्यापासून अडवलं नाही. जेव्हा बाबरला एखादी गोष्ट खाण्याची इच्छा व्हायची तेव्हा आम्ही त्याला दिली आहे.’ कराही लाहोरमधील प्रसिद्ध डिश आहे. पाकिस्तानी लोक मोठ्या आवडीने खातात.
बाबर आझम सध्या खराब फॉर्मातून जात आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला वारंवार संधी देऊनही काही खास करताना दिसत नाही. त्यामुळे आता त्याच्या सर्व आशा या पीएसएलवर अवलंबून आहेत. बाबर आझम आता पेशावर जाल्मीचा भाग आहे. या संघाचा मालकी हक्क जावेद आफ्रिदीकडे आहे. डॅरेन सॅमी या संघाचा हेड कोच आहे. पेशावर जाल्मीने पीएसएलचा एक किताब जिंकला आहे. 2017 मध्ये जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर आतापर्यंत जेतेपदापासून वंचित आहे. 2021 मध्ये अंतिम फेरी गाठली होती, पण मुल्तान सुल्तान्सने पराभूत केलं होतं.