VIDEO : Babar Azam ने त्याचा अपमान करणाऱ्या बॉलरला लय धुतलं, पुन्हा बोलायची हिम्मत करेल?

Babar Azam : पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आजमने काल एका गोलंदाजाला अजिबात दयामाया दाखवली नाही. T20 क्रिकेटमध्ये त्याचं हे रुप पहिल्यांदा पहायला मिळालं.

VIDEO : Babar Azam ने त्याचा अपमान करणाऱ्या बॉलरला लय धुतलं, पुन्हा बोलायची हिम्मत करेल?
babar azam
Image Credit source: psl/twitter
| Updated on: Feb 15, 2023 | 10:11 AM

लाहोर : पाकिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन बाबर आजमने काल एका गोलंदाजाला अजिबात दयामाया दाखवली नाही. T20 क्रिकेटमध्ये त्याचं हे रुप पहिल्यांदा पहायला मिळालं. PSL च्या 8 व्या सीजनमध्ये काल 14 फेब्रुवारीला एक मॅच झाली. त्यामध्ये बाबर आजमच रौद्र रुप पहायला मिळालं. बाबर आजमने एका बॉलरला जाम धुतलं. त्याने मॅचआधी बाबर आजमचा अपमान केला होता. पाकिस्तानच्या या दिग्गज बॉलरच नाव आहे, मोहम्मद आमिर. त्याने मॅचआधी एका मुलाखत दिली होती. त्यात त्याने बाबर आजमची तुलना 11 व्या नंबरच्या बॅट्समन बरोबर केली होती. बाबरने या मोहम्मद आमिर बरोबर सर्व हिशोब चुकता केला.

फक्त त्याची धुलाई

PSL मॅचमध्ये बाबर आजम आणि मोहम्मद आमिर आमने-सामने आले, तेव्हा बाबरची बॅटच सर्वकाही बोलून गेली. बाबरची बॅट अशी तळपली की, आमिरच्या बॉलिंगची सर्व इकॉनमी बिघडून गेली. त्याला एकही विकेट मिळाली नाही. फक्त त्याची धुलाई झाली.


PSL मध्ये बाबर vs आमिर

बाबर आजम आणि मोहम्मद आमिर कराचीच्या विकेटवर आमने-सामने आले. बाबरची पेशावर जाल्मी आणि कराची किंग्सची टीम आमने-सामने होती. मॅचमध्ये बाबरने आमिर विरुद्धची लढाई जिंकली. त्याचवेळी पेशावरने कराची किंग्सला हरवलं. बाबर पेशावर जाल्मीच नेतृत्व करत होता. आमिर कराची किंग्सकडून खेळत होता.


कितीच्या इकॉनमीने धावा दिल्या?

या मॅचमध्ये बाबर आजमने 46 चेंडूत 68 धावा फटकावल्या. बाबर आजमने मोहम्मद आमिरला चांगलच धुतलं. त्याने 4 ओव्हरमध्ये 10 पेक्षा जास्त इकॉनमीने 42 धावा दिल्या. एकही विकेट घेतला नाही. आमिरने केलेले ते वक्तव्य त्याला चांगलच महाग पडलं. बाबर आजम आणि 11 व्या नंबरचा बॅट्समन माझ्यासाठी सारखाच आहे, असं त्याने म्हटलं होतं.

बाबरने कॅप्टनलाही नाही सोडलं

पेशावर जाल्मीचा कॅप्टन बाबरने फक्त मोहम्मद आमिरचीच धुलाई केली नाही, तर त्याने कराची किंग्सचा कॅप्टन इमाद वसीमलाही सोडलं नाही. इमाद वसीम 3 ओव्हरमध्ये 42 धावा दिल्या.