BAN vs IND, 2nd Test : बांगलादेशने टीम इंडियाला ‘फिरवलं’, विजय खडतर

| Updated on: Dec 24, 2022 | 6:00 PM

BAN vs IND : टीम इंडियाला विजयासाठी आणखी 100 धावांची गरज आहे. मात्र तिसऱ्या दिवसापर्यंत 4 विकेट्स गमावले आहेत.

BAN vs IND, 2nd Test : बांगलादेशने टीम इंडियाला फिरवलं, विजय खडतर
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us on

ढाका : बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडिया (BAN vs IND 2nd Test) अडचणीत सापडली आहे. बांगलादेशने टीम इंडियाला (Team India) विजयासाठी 145 धावांचं सोपं आव्हान ठेवलं. मात्र टीम इंडियाने तिसऱ्या दिवसखेर बांगलादेशी फिरकीपटूंसमोर नांगी टाकली. टीम इंडियाने 45 रन्सवर 4 विकेट्स गमावल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जयदेव उनाडकट 3* आणि अक्षर पटेल 26* धावांवर नाबाद आहे. (ban vs ind 2nd test day 3 stumps team india needs to win 100 runs at shere bangla national stadium dhaka)

बांगलादेशने पहिल्या डावात 227 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाने 314 रन्स करत 87 धावांची आघाडी घेतली. यानंतर टीम इंडियाने बांगलादेशने दुसऱ्या डावात 231 धावांवर रोखलं. टीम इंडिया अजूनही विजयापासून 100 धावा दूर आहे. तर हातात 6 विकेट्स आहेत. मात्र चिंताजनक बाब अशी की टीम इंडियाचे प्रमुख फलंदाज हे आऊट झाले आहेत.

‘फिरकी गोलंदाजांनी फिरवलं’

फिरकी गोलंदाजांसाठी तिसरा दिवस अनुकूल ठरला. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनने पहिलीच ओव्हर टाकली आणि टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या. तर दुसऱ्या बाजूने ताईजुल इस्लामने डोकेदुखी वाढवली. तिसऱ्या ओव्हरमध्ये शाकिबने कॅप्टन केएल राहुलला विकेटकीपर नुरुल हसनच्या हाती कॅच आऊट केलं. तर मेहेदी हसन मिराजने चेतेश्वर पुजाराला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

हे सुद्धा वाचा

मिराजने यानंतर ओपनर शुबमन गिलला आऊट केलं. गिल आणि पुजारा हे दोघे स्टपिंग आऊट झाले. विराट कोहलीकडून टीम इंडियाला फार अपेक्षा होत्या. मात्र विराटनेही निराशा केली. विराट 1 रन करुन आऊट झाला.

बांग्लादेश प्लेइंग इलेव्हन : शाकिब अल हसन (कर्णधार), नजमुल हुसेन, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिट्टन दास, नुरूल हसन, मेहदी हसन, ताइजुल इस्लाम, खालेद अहमद आणि तस्कीन अहमद.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, आर अश्विन, अक्षर पटेल, जयदेव उनादकट, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज.