BBL 2025-26: पंजाब किंग्सच्या खेळाडूने बाबर आझमची लाज काढली, बाद करताच खूप काही सुनावलं Video

ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅग लीग स्पर्धेत सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात पाकिस्तानचा बाबर आझम पुन्हा एकदा फेल गेला. 17 चेंडूत फक्त 14 धावा केल्या. पण बाद झाल्यानंतर खाली मान घालून जावं लागलं.

BBL 2025-26: पंजाब किंग्सच्या खेळाडूने बाबर आझमची लाज काढली, बाद करताच खूप काही सुनावलं Video
BBL 2025-26: पंजाब किंग्सच्या खेळाडूने बाबर आझमची लाज काढली, बाद करताच खूप काही सुनावलं Video
Image Credit source: video grab
| Updated on: Jan 09, 2026 | 6:00 PM

पाकिस्तानचा बाबर आझमला काही केल्या सूर गवसताना दिसत नाही. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी पाकिस्तानने अजून संघ जाहीर केलेला नाही. कदाचित पाकिस्तानची निवड समिती मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांचा फॉर्म बघत असावेत. बिग बॅश लीग स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर त्यांची संघात निवड करणं सोपं होईल. पण या दोघांनी या स्पर्धेत सुमार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांची निवड काही शक्य नाही असंच दिसत आहे. बिग बॅश लीग स्पर्धेत सिडनी सिक्सर्स आणि मेलबर्न स्टार्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात सिडनी सिक्सर्सकडून बाबर आझम फलंदाजीला उतरला होता. पण पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या मार्कस स्टोयनिसने त्याला बाद करत तंबूचा रस्ता दाखवला. बाबर आझम 17 चेंडूत 14 धावा करून बाद झाला. मार्कस स्टोयनिसने त्याला बाद केल्यानंतर बरंच काही सुनावलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मेलबर्न स्टार्सचं कर्णधारपद पंजाब किंग्सकडून आयपीएल खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टोयनिसकडे आहे. मेलबर्न स्टार्सने प्रथम फलंदाजी करताना 128 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी सिडनी स्टार्सकडून बाबर आझम ओपनिंगला आला होता. पण मार्कस स्टोयनिसने संघाचं सातवं षटक टाकताना इनस्विंग केला आणि पायचीत होत बाबर आझमचा खेळ संपला. बाबर आझमला बाद केल्यानंतर मार्कस स्टोयनिस चांगलाच रागात होता. त्यावेळी त्याने बाबर आझमला बरंच काही सुनावलं. पण बाबर आझमकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते. त्यामुळे मान खाली घालून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. असं असलं तरी सिडनी सिक्सर्सने हा सामना 17.1 षटकात 4 गडी गमवून जिंकला.

मार्कस स्टोयनिस हा पंजाब किंग्सकडून खेळणार आहे. मागच्या पर्वात पंजाब किंग्सने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. पण आरसीबीकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पंजाब किंग्सने मार्कस स्टोयनिससाठी 11 कोटींची बोली लावली आणि संघात घेतल आहे. स्टोयनिस बिग बॅश लीग स्पर्धेत 119 सामने खेळला असून 3163 धावा केल्या आहेत. तसेच 53 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये 109 सामने खेळला असून 2026 धावा आणि 44 विकेट घेतल्या आहे.