AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरूष क्रिकेटच्या तुलनेत महिला क्रिकेटपटूंची बॅट किती छोटी असते? चेंडूमध्येही असतो असा फरक

मेन्स क्रिकेटप्रमाणे आता वुमन्स क्रिकेटचा क्रेझही दिवसागणिक वाढताना दिसत आहे. द्विपक्षीय मालिका, मल्टीनॅशनल स्पर्धा यामुळे महिला क्रिकेटला मोठं व्यासपीठ मिळालं आहे. 9 जानेवारीपासून वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात होणार आहे. चला जाणून घेऊयात पुरूषांच्या तुलनेत महिला क्रिकेटमध्ये किती फरक आहे ते...

पुरूष क्रिकेटच्या तुलनेत महिला क्रिकेटपटूंची बॅट किती छोटी असते? चेंडूमध्येही असतो असा फरक
पुरूष क्रिकेटच्या तुलनेत महिला क्रिकेटपटूंची बॅट किती छोटी असते? चेंडूमध्येही असतो असा फरकImage Credit source: PTI
| Updated on: Jan 09, 2026 | 4:01 PM
Share

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेला 9 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. यंदा हे स्पर्धेचं चौथं पर्व आहे. महिनाभर क्रीडाप्रेमींना स्पर्धेचा आनंद लुटता येणार आहे. 28 दिवसात एकूण 22 सामने खेळले जाणार असून चाहत्यांचं या स्पर्धेत चांगलंच मनोरंजन होणार यात काही शंका नाही. पण तुम्हाला माहिती आहे का? पुरूष क्रिकेटच्या तुलनेत महिलांचं क्रिकेट थोडं वेगळं असतं. सर्व नियम सारखेच असतात यात काही दुमत नाही. पण महिला क्रिकेटमध्ये वापरली जाणारी बॅट आणि चेंडूच्या वजनात फरक असतो. इतकंच काय तर मैदानाचा परीघ देखील पुरूषांच्या तुलनेत वेगळा असतो. त्यामुळे महिला आणि पुरूष क्रिकेट सारखं वाटत असतं तरी हा थोडासा फरक मात्र आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर काय ते…

महिला आणि पुरूषांच्या बॅटमधील फरक

महिला आणि पुरूषांच्या बॅटमध्ये खूप फरक असतो. पुरूषांच्या बॅटचं वज 1134 ग्रॅम ते 1360 ग्रॅमपर्यंत असते. या तुलनेत महिलांची बॅट हलकी असते. त्याचं वजन 1049 ग्रॅम ते 1190 ग्रॅम असते. महिलांची ताकद आणि बॅट फिरवण्याची ताकद पाहता बॅट वजनाने हलकी ठेवली आहे. पुरूषांची बॅट लांब आणि थोडी रूंद असते. तर बॅटचा दांडा हा 36-35मीमी लांब असतो. महिलांचं हँडल 34 ते 36 मीमी असते. महिला क्रिकेटपटू शॉर्ट हँडल किंवा हिरो साइज बॅटचा वापर करतात. बॅटची लांबी खेळाडूंच्या उंचीवरही अवलंबून असते.

महिला क्रिकेट आणि पुरूष क्रिकेटमधील चेंडूचा फरक

महिला क्रिकेटमध्ये वापरला जाणारा चेंडू पुरूषांच्या तुलनेने हलका असतो. महिला क्रिकेटमध्ये 140 ते 151 ग्राम वजनाचा चेंडू वापरला जातो. तर पुरूषांच्या क्रिकेटमध्ये 155 ते 165 ग्राम वजनाचा चेंडू वापरला जातो. दोन्ही क्रिकेटमध्ये चेंडूंची साईज सारखीच असते. पण महिलांची ताकद आणि स्पीड लक्षात घेत चेंडू त्या तुलनेनं हलका केला आहे. यामुळे जास्तीचा स्विंग मिळतो.

क्रिकेट मैदानाचं परीघ

महिला क्रिकेटमध्ये पुरूष क्रिकेटच्या तुलनेत परीघ लहान असतं. आयसीसी नियमानुसार, महिला क्रिकेटमध्ये मैदानातील परीघ हे 23 मीटरवर असतं. तर पुरूषांचं परीघ हे 27.43 मीटरवर असते. महिलांच्या ताकदीचा अंदाज घेऊन हे परीघ कमी केलं आहे. परीघ छोटं असल्याने महिला क्रिकेट पॉवरप्लेमध्ये जास्तीची जोखिम घेऊ शकतात.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...