WPL 2026 स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत Vs मंधाना सामना, असे आहेत दोन्ही संघ
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या पर्वाला 9 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिलाच सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होत आहे. चला जाणून घेऊयात पहिल्या सामन्यात कोणाचं पारडं जड ते...

वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं बिगुल वाजलं असून पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे संघ आमनेसामने येणार आहेत. मुंबई इंडियन्स या स्पर्धेचं दोनदा जेतेपद मिळवलं आहे. तर आरसीबीच्या पदरात एकदा जेतेपद पडलं आहे. त्यामुळे दोन्ही तूल्यबल संघ आहेत. मुंबई इंडियन्स संघाची धुरा हरमप्रीत कौरच्या खांद्यावर आहे. तर आरसीबीचं नेतृत्व स्मृती मंधाना करत आहे. पहिला सामना नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. मुंबई इंडियन्स संघ आरसीबीच्या तुलनेत कागदावर तरी तगडा दिसत आहे. हरमनप्रीत कौरचं नेतृत्व आणि संघात इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर ब्रंट आणि वेस्ट इंडिजची कर्णधार हिली मॅथ्यूज आहे. न्यूझीलंडची अमेलिया केर, ऑस्ट्रेलियाची मिल्ली इलिंगवर्थ आणि भारताची अमनजोत कौर या संघात आहेत. त्यामुळे आरसीबीच्या तुलनेत मुंबई इंडियन्सचा संघ वजनदार दिसत आहे.
दुसरीकडे, आरसीबीची धुरा स्मृती मंधानाकडे असून वनडे वर्ल्डकप स्पर्धेत तिचा जबरदस्त फॉर्म पाहायला मिळाला. पण श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत फार काही करू शकली नाही. असं असलं तरी स्मृती मंधानाला सूर गवसण्यास फार काही वेळ लागणार नाही. स्मृती मंधानासह या संघात ऑस्ट्रेलियाची जॉर्जिया वोल, अष्टपैलू ग्रेस हॅरिस आणि दक्षिण अफ्रिकेची अष्टपैलू नादिन डी क्लार्क आहे. इतकंच काय तर आक्रमक फलंदाज आणि विकेटकीपर ऋचा घोषही आहे.
पिच रिपोर्ट
स्पर्धेतील सुरूवातीचे 11 सामने नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स अकादमी येथे होणार आहे. पहिला सामनाही या मैदानात होणार आहे. डॉ डीवाय पाटील येथील खेळपट्टी फलंदाजांसाठी पूरक आहे. त्यामुळे या खेळपट्टीवर फलंदाज मोठी धावसंख्या करू शकतात. या खेळपट्टीवर चेंडू उसळी घेतो आणि सातत्यपूर्ण वेग आहे. त्या उच्च-स्कोअरिंग साना होऊ शकतो.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11
मुंबई इंडियन्स : हिली मॅथ्यूज, नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, सजीवन सजना, अमनजोत कौर, जी कमलिनी, शबनीम इस्माईल, सायका इशाक, निकोला केरी, पूनम खेमनार
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : स्मृती मानधना (कर्णधार), ऋचा घोष, श्रेयंका पाटील, नादिन डी क्लार्क, ग्रेस हॅरिस, जॉर्जिया वॉल, राधा यादव, लॉरेन बेल, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, दयालन हेमलता
