AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी बांगलादेश टीम जाहीर, IPL मधून हकालपट्टी झालेल्या मुस्तफिजुर रहमानबाबत मोठा निर्णय

Bangladesh Sqaud For T20i World Cup 2026 : मुस्तफिजूर रहमान याला आयपीएलमधून वगळण्यात आल्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केलाय.

T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी बांगलादेश टीम जाहीर, IPL मधून हकालपट्टी झालेल्या मुस्तफिजुर रहमानबाबत मोठा निर्णय
Bangladesh Mustafizur RahmanImage Credit source: PTI
| Updated on: Jan 04, 2026 | 4:58 PM
Share

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याचा अखेर आयपीएलच्या 19 मोसमातून (IPL 2026) पत्ता कट करण्यात आला आहे. अभिनेता शाहरुख खान याच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) टीमने मुस्तफिजूरला मिनी ऑक्शनमधून आपल्या ताफ्यात घेतलं होतं. मात्र वाढत्या विरोधानंतर आणि बीसीसीआयच्या आदेशानंतर अखेर मुस्तफिजूर याची संघातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मुस्तफिजूर रहमानवरुन वाद असतानाच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीबीने आगामी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे.

बीसीबीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात एकूण 15 खेळाडूंना संधी दिली आहे. लिटन दास बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. बीसीबीने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघात मुस्तफिजूर रहमान यालाही संधी दिली आहे. बांगलादेश वर्ल्ड कप मोहिमेतील आपला पहिला सामना हा 7 फेब्रुवारीला खेळणार आहे.

बांगलादेशची कामगिरी

बांगलादेशने आतापर्यंत झालेल्या 9 टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत भाग घेतला आहे. मात्र बांगलादेशला अद्याप एकदाही उपांत्य फेरीतही पोहचता आलेलं नाही. यंदा भारत आणि श्रीलंका इथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे बांगलादेश या संधीचा फायदा घेत वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बांगलादेश कोणत्या ग्रुपमध्ये?

दरम्यान आयसीसीने टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 20 संघांना 5-5 नुसार 4 गटात विभागण्यात आलं आहे.  बांगलादेशचा सी ग्रपुमध्ये समावेश करण्यात आला आहे. या ग्रुपमध्ये पहिल्यांदा टी 20i वर्ल्ड कप खेळणाऱ्या इटलीसह नेपाळ, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांचा समावेश आहे. बांगलादेशने आतापर्यंत अनेक संघांना पराभूत केलंय. सी ग्रुपमध्ये नेपाळ आणि इटली हे संघ तुलनेत नवखे आहेत.  मात्र बांगलादेशसमोर वेस्ट इंडिज आणि इंग्लंडचं आव्हान असणार आहे.

बांगलादेशच्या सामन्यांचं वेळापत्रक

विरुद्ध वेस्ट इंडिज, 7 फेब्रुवारी, कोलकाता

विरुद्ध इटली, 9 फेब्रुवारी, कोलकाता

विरुद्ध इंग्लंड, 14 फेब्रुवारी, कोलकाता

विरुद्ध नेपाळ, 17 फेब्रुवारी, मुंबई

वर्ल्ड कपसाठी बांगलादेश संघाची घोषणा

टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी बांगलादेश टीम : लिट्टन दास (कर्णधार), तंझीद हसन, परवेज होसैन, सैफ हसन, तॉहीद हृदॉय, शमीम होसैन, नुरुल हसन, मेहदी हसन, रिशाद होसैन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तनजीम हसन साकिब, तस्कीन अहमद, शैफुद्दीन आणि शोरीफुल इस्लाम.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...