
मुंबई | टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंड टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. 25 जानेवारी ते 11 मार्च दरम्यान या मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. टीम इंडियासाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-25 च्या हिशोबाने महत्त्वाची आहे. तसेच इंग्लंडही या टेस्ट सीरिजसाठी जोरात तयारी करत आहे.
एका बाजूला कसोटी मालिकेची चर्चा सुरु आहे. तर दुसऱ्या बाजूला बीसीसीआयने पहिल्या 2 सामन्यांसाठी 13 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. बीसीसीआयने टीम इंडिया ए ची घोषणा केली आहे. टीम इंडिया ए इंग्लंड लायन्स विरुद्ध 2 सामने खेळणार आहे. पहिला सराव सामना हा 2 दिवसांचा आहे. तर दुसरा सामना हा एकूण 4 दिवसांचा आहे.
पहिला सामना, 12-13 जानेवारी, नरेंद्र मोदी स्टेडियम ग्राउंड बी, अहमदाबाद.
दुसरा सामना, 17-20 जानेवारी, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद.
टीम इंडिया ए | अभिमन्यू इश्वरन (कॅप्टन), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान, प्रदोष रंजन पॉल, केएस भरत (विकेटकीपर), मानव सुथार, पुलकित नारंग, नवदीप सैनी, तुषार देशपांडे, विद्वत कवेरप्पा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) आणि आकाश दीप.
टीम इंडिया ए
🚨 News 🚨
India ‘A’ squad for 2-day warm-up fixture & first multi-day game against England Lions announced
Details ⬇️https://t.co/GOjfP0TJve
— BCCI (@BCCI) January 6, 2024
दरम्यान त्याआधी टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पहिल्यांदाच टी 20 मालिका होणार आहे. अफगाणिस्तानने टी 20 मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. तर अजून टीम इंडियाची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या हिशोबाने रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांचं कमबॅक होणार असल्याचं निश्चित आहे. इतकंच नाही, तर रोहितला पुन्हा एकदा कर्णधारपदाची सूत्रं मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
पहिला सामना, 11 जानेवारी, मोहाली.
दुसरा सामना, 14 जानेवारी, इंदूर.
तिसरा सामना , 17 जानेवारी, बंगळुरु