Team India : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन कोण?

Indian Womens Cricket Team T20I World Cup 2026 : बीसीसीआय वुमन्सकडून टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. जाणून घ्या कुणाला मिळाली संधी.

Team India : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा, कॅप्टन कोण?
Womens T20I World Cup Trophy
Image Credit source: Scott Barbour/Getty Images
| Updated on: May 02, 2026 | 6:07 PM

आगामी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला आता मोजून काही दिवस बाकी आहेत. या स्पर्धेचा 12 जूनपासून थरार रंगणार आहे. या बहुप्रतिक्षित स्पर्धेसाठी बीसीसीआयने शनिवारी 2 मे रोजी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. हरमनप्रीत कौर टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर सांगलीकर स्मृती मंधाना हीच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

कुणाला डच्चू?

वुमन्स टीम इंडियाने काही महिन्यांपूर्वी नोव्हेंबर 2025 मध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं होतं. टीम इंडियाची वर्ल्ड कप जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली होती. निवड समितीने या टी 20i वर्ल्ड कपसाठी गेल्या स्पर्धेतील अपवाद वगळता बहुतांश खेळाडूंना संधी दिली आहे. मात्र फॉर्मेट वेगळा असल्याने काही खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही. यामध्ये वनडे टीममधील ओपनर प्रतिका रावल हीला संधी देण्यात आलेली नाही. तसेच ऑलराउंडर स्नेह राणा, अमनजोत कौर आणि हर्लीन देओल यांनाही स्थान मिळालेलं नाही.

यास्तिका भाटीयाचं कमबॅक

टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघा युवा विकेटकीपर फलंदाज यास्तिका भाटीया हीचं कमबॅक झालं आहे. यास्तिकाचं तब्बल 2 वर्षांनी कमबॅक झालं आहे.

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी वुमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कप्तान), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रोड्रिग्स, भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, श्री चरणी, यास्तिका भाटिया, नंदिनी शर्मा, अरुंधति रेड्डी, रेणुका ठाकुर, क्रांती गौड, श्रेयंका पाटील आणि राधा यादव.

Follow Us