AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी

भारतीय संघ पुढच्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी भारतीय संघात कोण असेल याची उत्सुकता शिगेला होती. अखेर पाच टी20 सामने आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय महिला संघाची निवड केली आहे. जाणून घ्या कोण आहे या संघात ते

IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, या खेळाडूंना मिळाली संधी
बीसीसीआय Image Credit source: TV9 Network
| Updated on: May 15, 2025 | 7:04 PM
Share

भारतीय महिला आणि पुरुष संघ पुढच्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटीतून निवृत्ती घेतल्याने कर्णधारपदासाठी नव्या नावाचा विचार होत आहे. त्यामुळे संघ जाहीर करण्यास उशीर होत आहे. 23 मे रोजी भारतीय संघाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय महिला संघ इंग्लंडमध्ये वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. पाच सामन्यांची टी20 मालिका आणि 3 सामन्यांची वनडे मालिका असणार आहे. भारतीय महिला संघ 28 जून ते 22 जुलै दरम्यान इंग्लंडविरुद्ध पाच टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. टी20 मालिका 28 जूनपासून सुरु होणार आहे. तर वनडे मालिका 16 जुलै ते 22 जुलै दरम्यान असणार आहे. या दोन्ही संघाची धुरा हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर आहे.

हरमनप्रीत कौरला दोन्ही संघांचे कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर स्मृती मंधाना हीच्याकडे दोन्ही फॉरमेटमध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची घोषणा

वनडे मालिकेसाठी भारतीय वुमन्स संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुची उपाध्याय, अमनज्योति कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे

टी20 मालिकेसाठी भारतीय वुमन्स संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुची उपाध्याय, अमनज्योत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे

भारत आणि इंग्लंड सामन्यांचं वेळापत्रक

  • भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला टी20 सामना, 28 जून (संध्याकाळी 7 वाजता)
  • भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरा टी20 सामना, 1 जुलै (रात्री 11 वाजता)
  • भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरा टी20 सामना, 4 जुलै(रात्री 11.05 वाजता)
  • भारत विरुद्ध इंग्लंड, चौथा टी20 सामना, 9 जुलै (रात्री 11 वाजता)
  • भारत विरुद्ध इंग्लंड, पाचवा टी20 सामना, 12 जुलै (रात्री 11.05 वाजता)
  • भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला वनडे सामना, 16 जुलै (संध्याकाळी 5.30 वाजता)
  • भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरा वनडे सामना, 19 जुलै (दुपारी 3.30 वाजता)
  • भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरा वनडे सामना, 22 जुलै (संध्याकाळी 5.30 वाजता)

Follow Us
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!