IPL 2026 Playoffsचं वेळापत्रक जाहीर, बंगळुरुऐवजी अहमदाबादमध्ये फायनल, मुंबईत एकही सामना नाही

IPL 2026 Playoffs Schedule : क्रिकेट चाहत्यांना गेल्या अनेक आठवड्यांपासून आयपीएलच्या 19 व्या मोसमातील प्लेऑफचे सामने कुठे आणि कधी होणार? याची उत्सूकता होती. अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे.

IPL 2026 Playoffsचं वेळापत्रक जाहीर, बंगळुरुऐवजी अहमदाबादमध्ये फायनल, मुंबईत एकही सामना नाही
IPL 2026 Playoffs Schedule
Image Credit source: IPL X Account
| Updated on: May 06, 2026 | 4:09 PM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात प्लेऑफसाठी एकूण 10 संघांमध्ये कमालीची चढाओढ पाहायला मिळत आहेत. काही संघ प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहेत. तर काही संघांचा संघर्ष अजूनही सुरुच आहे. अद्याप एकही संघ अधिकृतरित्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झालेला नाही. त्यामुळे कोणताही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतो. त्यामुळे एकूण 4 जागांसाठी जोरदार रस्सीखेच आहे. अशात आता मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने 19 व्या मोसमातील बहुप्रतिक्षित प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या प्लेऑफमधील एकूण 4 सामने कधी आणि कुठे होणार? हे आपण जाणून घेऊयात.

प्लेऑफमध्ये एकूण 4 सामने होतात. या 4 सामन्यांमध्ये क्वालिफायर 1, क्वालिफायर 2, एलिमिनेटर आणि फायनलचा समावेश असतो.  प्लेऑफच्या शर्यतीत टॉप 2 मध्ये असल्याने अंतिम फेरीत पोहचण्याची 1 अधिक संधी मिळते. त्यामुळे कायमच संघांचा टॉप 2 मध्ये राहण्याचा प्रयत्न असतो. प्लेऑफसाठी पात्र ठरलेल्या 4 पैकी अव्वल 2 संघात क्वालिफायर 1 सामना खेळवण्यात येतो. क्वालिफायर 1 मधील विजयी संघ थेट अंतिम फेरीत पोहचतो. क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ आणि एलिमिनेटरमधील विजेता संघ यांच्यात क्वालिफायर 2 चा थरार रंगतो. या क्वालिफायर 2 मधील विजेता संघ अंतिम फेरीत पोहचतो. तर अंतिम सामन्यानंतर विजेता निश्चित होतो.

आयपीएल 2026 प्लेऑफचं वेळापत्रक

यंदा एकूण 3 शहरांमधील स्टेडियममध्ये प्लेऑफमधील सामन्यांचा थरार रंगणार आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. अहमदाबादमध्ये गेल्या 5 वर्षांत फायनलचं आयोजन करण्याची ही चौथी वेळ ठरली आहे. तसेच न्यू चंडीगडमध्ये एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 असे एकूण 2 सामने खेळवण्यात येणार आहेत. तर क्वालिफायर 1 हा सामना धर्मशालेतील एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात 5 मे पर्यंत एकूण 48 सामने खेळवण्यात आले आहेत. तर साखळी फेरीतील 70 वा आणि शेवटचा सामना हा 24 मे रोजी होणार आहे. त्यानंतर 1 दिवसाच्या विश्रांतीनंतर 26 मे पासून प्लेऑफचा थरार रंगेल. क्वालिफायर 1 सामन्यापासून प्लेऑफला सुरुवात होईल. तर 31 मे रोजी विजेता ठरेल. या सर्व सामन्यांना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

प्लेऑफच्या सामन्यांच्या तारखा जाहीर, चाहत्यांची प्रतिक्षा संपली

प्लेऑफचं वेळापत्रक

26 मे, क्वालिफायर 1, एचपीसीए स्टेडियम, धर्मशाला

27 मे, एलिमिनेटर, न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, न्यू चंडीगड

29 मे, क्वालिफायर 2, न्यू इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, न्यू चंडीगड

31 मे, फायनल, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

Follow Us