.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: आयपीएल स्पर्धेपूर्वी दहा फ्रेंचायझी कर्णधारांनी केली चर्चा, एका नियमाला विरोध पण…

आयपीएल 2026 स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेपूर्वी दहा फ्रेंचायझी कर्णधारांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. बहुतांश कर्णधारांनी आयपीएलमधील एका नियमाला विरोध केला. पण तरीही हा लागू असणार आहे.

IPL 2026: आयपीएल स्पर्धेपूर्वी दहा फ्रेंचायझी कर्णधारांनी केली चर्चा, एका नियमाला विरोध पण...
IPL 2026: आयपीएल स्पर्धेपूर्वी दहा फ्रेंचायझी कर्णधारांनी केली चर्चा, एका नियमाला विरोध पण...Image Credit source: IPL Twitter
| Updated on: Mar 25, 2026 | 10:42 PM
Share

IPL 2026 captain’s meet: आयपीएल 2026 स्पर्धा आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. 28 मार्चपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. पुढचे दोन महिने जेतेपदाची शर्यत पाहायला मिळणार आहे. असं असताना या स्पर्धेपूर्वी दहा संघांच्या कर्णधारांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आयपीएलच्या काही नियमांवर चर्चा झाली. आयपीएलच्या एका नियमावर बहुतांश कर्णधार नाराज होते आणि त्यांनी या नियमाचा मुद्दा बैठकीत उचलला. हा नियम दुसरा तिसरा कोणता नसून इम्पॅक्ट प्लेयर आहे. 2023 पासून हा नियम लागू आहे. या नियमामुळे बरीच गणितं बदललेली दिसत आहे. आयपीएलच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अधिकांश कर्णधार इम्पॅक्ट प्लेयर नियमाच्या विरोधात आहेत. त्यांनी या नियमावर बोट ठेवत नाराजी व्यक्त केली. पण असं असलं तरी बीसीसीआयने हा नियम 2027 पर्यंत लागू असेल असं सांगितलं आहे. पण तरीही त्यावरून चर्चा होताना दिसत आहे. या बैठकीत स्पष्टपणे सांगितलं गेलं की, या नियमावर चर्चा 2027 नंतर केली जाईल. म्हणजे अजून दोन वर्षे हा नियम लागू असेल.

अक्षर पटेलचा विरोध

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याने या स्पर्धेपूर्वीच इम्पॅक्ट नियमावर आक्षेप घेतला. यापूर्वी रोहित शर्मा आणि इतर दिग्गज खेळाडूंनीही विरोध दर्शवला आहे. रोहित शर्माने 2024 मध्ये स्पष्ट सांगितलं होतं की, इम्पॅक्ट प्लेयर नियमाशी सहमत नाही. कारण यामुळे भारतीय क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंची संख्या घटू शकते. इतकंच काय तर हार्दिक पांड्यानेही सांगितलं की, या नियमामुळे संघात अष्टपैलू निवडणं कठीण झालं आहे. नुकतंच अक्षर पटेलने मीडियाशी चर्चा सांगितलं की, इम्पॅक्ट प्लेयर आवडत नाही कारण यामुळे अष्टपैलू खेळाडूंची भूमिका संपते.

10 षटकानंतर चेंडू बदलण्याचा प्रस्ताव

आयपीएल कर्णधारांच्या बैठकीत आणखी एक मुद्दा एका कर्णधाराने जोरकसपणे मांडला गेला. यात पहिल्या डावात 10 षटकानंतर चेंडू बदलण्याचा प्रस्ताव ठेवला. पण त्याला इतरांची साथ मिळाली नाही. दुसऱ्या डावात दव पडतं म्हणून हा नियम लागू राहिल. त्यामुळे त्या कर्णधाराच्या म्हणण्याला केराची टोपली दाखवली असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे, बीसीसीआयच्या नव्या नियमाची आठवण सर्व कर्णधारांना करून देण्यात आली. या नियमानुसार, सामन्याच्या दिवशी सरावाला परवानगी दिली जाणार नाही. इतकंच काय तर एखाद्या संघाने लवकर सराव संपवला तरी दुसऱ्या संघाला खेळपट्टी वापरण्यास मिळणार नाही.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर