Delhi Capitals vs Punjab Kings सामन्याचे ठिकाण बदलले, कोरोनामुळे BCCI चा मोठा निर्णय

| Updated on: Apr 19, 2022 | 4:42 PM

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या 32 व्या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. बीसीसीआयने (BCCI) पुण्यात होणारा दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज (Delhi Capitals vs Punjab Kings) यांच्यातील सामना मुंबईत हलवला आहे.

Delhi Capitals vs Punjab Kings सामन्याचे ठिकाण बदलले, कोरोनामुळे BCCI चा मोठा निर्णय
Rishabh Pant - Delhi Capitals
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या 32 व्या सामन्याचे ठिकाण बदलण्यात आले आहे. बीसीसीआयने (BCCI) पुण्यात होणारा दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज (Delhi Capitals vs Punjab Kings) यांच्यातील सामना मुंबईत हलवला आहे. एमसीए स्टेडियमवर होणारा दिल्ली विरुद्ध पंजाब सामना मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. हा सामना नियोजित तारखेला 20 एप्रिललाच होणार आहे. बीसीसीआयने निवेदन जारी करून म्हटले आहे की, ‘दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्जचा सामना पुण्याहून मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये हलवण्यात आला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या कॅम्पमध्ये आतापर्यंत 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लांबचा बस प्रवास योग्य नाही, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दिल्ली कॅपिटल्सच्या 5 सदस्यांना कोरोना झाला आहे. सर्वप्रथम, दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट कोरोनाच्या विळख्यात सापडले. 15 एप्रिल रोजी ते पॉझिटिव्ह आढळले होते. यानंतर 16 एप्रिल रोजी दिल्लीचे स्पोर्ट्स मसाज स्पेशलिस्ट चेतन कुमार कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 18 एप्रिल रोजी दिल्लीचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याच दिवशी टीम डॉक्टर अभिजीत साळवी यांना कोरोना झाला. 18 एप्रिल रोजी दिल्लीच्या सोशल मीडिया कंटेंट टीमचा सदस्य असलेला आकाश माने देखील कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले.

IPL 2022 स्पर्धा अडचणीत

आयपीएल 2022 स्पर्धा आता मोठ्या संकटात सापडली आहे कारण दिल्ली कॅपिटल्सचे जे सदस्य प्रत्येक खेळाडूच्या संपर्कात असतात त्यांना कोरोना झाला आहे. टीम फिजिओ, मसाज स्पेशालिस्ट आणि टीम डॉक्टर विळख्यात आले आहेत.

सामन्यानंतर खेळाडू त्यांच्यासोबत राहतात. मिचेल मार्शने फिजिओ पॅट्रिक फरहार्टसोबतही बराच वेळ घालवला होता. मार्शप्रमाणेच आणखी काही खेळाडू असतील जे फिजिओ किंवा टीम डॉक्टर, मसाज स्पेशालिस्ट यांच्यासोबत असावेत. अशा परिस्थितीत संघातील इतर सदस्यांवरही कोरोनाची टांगती तलवार आहे.

इतर बातम्या

IPL 2022 Orange Cap : जॉस बटलर 272 धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर,पर्पल कॅप युझवेंद्र चहलकडे कायम

RR vs KKR IPL Match Result: अरेरे, KKR चा निसटता पराभव, चहलची गेम चेंजिंग ओव्हर

RR vs KKR IPL 2022: दोघांनी मिळून घेतली एक कॅच, पहा बाउंड्रीवरील अफलातून झेल VIDEO, तुम्ही सुद्धा म्हणाल जबरदस्त