
लाहोर : पाकिस्तानी सिलेक्टर्सनी शुक्रवारी आपल्या वर्ल्ड कप टीमची घोषणा केली. आशिया कप स्पर्धेत सुपर-4 मध्ये पाकिस्तानच आव्हान संपुष्टात आलं. पाकिस्तानच सगळं लक्ष आता 5 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपवर असणार आहे. भारतात होणाऱ्या क्रिकेटच्या महाकुंभाच्या तयारीसाठी पाकिस्तानने प्लान बनवलाय. पण त्या सगळ्या प्लानवर पाणी फेरलं जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानची टीम आता कुठलीही सीरीज खेळणार नाहीय. भारतात वर्ल्ड कपसाठी रवाना होण्याआधी पाकिस्तानी टीमला काही दिवस दुबईला थांबायच होतं. पण खेळाडूंच्या व्हिसामध्ये प्रॉब्लेम येतोय. त्यामुळे त्यांचा हा प्लान कॅन्सल होऊ शकतो.
पाकिस्तानी टीम पुढच्या आठवड्यात यूएईला रवान होणार होती. टीम काही दिवस तिथे थांबून नंतर हैदराबादला जाणार होती. तिथेच पाकिस्तान पहिला सराव सामना खेळणार आहे. 29 सप्टेंबरला न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तानी टीम सराव सामना खेळणार आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोने हे वृत्त दिलय. पाकिस्तानी टीम आता पुढच्या आठवड्यात बुधवारी लाहोरहून दुबईला रवाना होईल. तिथून हैदराबादला जाणार आहे. वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या 9 टीम्सपैकी पाकिस्तान अशी एकमेव टीम आहे, ज्यांना अजून व्हिसा मिळालेला नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यात राजकीय पातळीवर चांगले संबंध नाहीयत. त्यामुळे दोन्ही देशात येणं-जाणं खूप कठीण आहे.
पाकिस्तानी टीम शेवटची भारतात कधी आलेली?
पाकिस्तान आणि भारत दोन्ही देशांमध्ये मागच्या अनेक वर्षांपासून क्रिकेट मालिका बंद आहेत. दोन्ही देश परस्परांचे दौरे करत नाहीत. फक्त आयसीसी टुर्नामेंटमध्ये दोन्ही टीम आमने-सामने येतात. दोन्ही देशांणध्ये शेवटची द्विपक्षीय मालिका 2012 मध्ये झाली होती. त्यावेळी पाकिस्तानी टीमने भारताचा दौरा केला होता. त्यानंतर पाकिस्तानी टीम फक्त एकदाच भारतात आली आहे. 2016 आयसीसी टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानी टीम भारतात आली होती. टीम इंडियाने आशिया कप 2023 साठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला. यामुळे आशिया कपचे बहुतांश सामने श्रीलंकेत खेळवावे लागले.