AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS | जिंकलो, पण शार्दुल ठाकूरसाठी दिग्गज खेळाडूच बलिदान कधीपर्यंत द्यायच?

IND vs AUS | टीम इंडियाने मॅच जिंकली. पण एका खेळाडूंने टेन्शन दिलं आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच मोठ नुकसान होऊ शकतं. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिली वनडे जिंकलो. पण शार्दुल ठाकूरने अपेक्षित प्रदर्शन केलं नाही.

IND vs AUS |  जिंकलो, पण शार्दुल ठाकूरसाठी दिग्गज खेळाडूच बलिदान कधीपर्यंत द्यायच?
IND vs AUS 1st ODIImage Credit source: BCCI
| Updated on: Sep 23, 2023 | 8:38 AM
Share

मोहाली : टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तीन वनडे सामन्यांच्या सीरीजमध्ये दमदार सुरुवात केली आहे. वर्ल्ड कपआधी होणाऱ्या या वनडे सीरीजकडे वॉर्मअप म्हणून पाहिलं जात आहे. टीम मॅनेजमेंट आणि काही खेळाडूंसाठी या सीरीजच वेगळं महत्त्व आहे. या सीरीजमधील प्रदर्शनावर सगळ्यांची नजर असेल. मोहालीमध्ये टीम इंडियाने अपेक्षेनुसार प्रदर्शन केलं. पण एका खेळाडूंची कामगिरी नक्कीच चिंतेचा विषय आहे. मोहालीमधील पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, स्टार फलंदाज विराट कोहली आणि काही प्रमुख खेळाडू प्लेइंग 11 मध्ये नव्हते. या खेळाडूंना पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी आराम देण्य़ात आलाय, या दिग्गजांशिवाय टीम इंडिया कशी कामगिरी करणार हे महत्त्वाच आहे. ज्या खेळाडूंना वर्ल्ड कपच्या स्क्वाडमध्ये निवडलय त्यांना स्वत:ला सिद्ध करावं लागेल. बहुतांश आघाड्यांवर टीम इंडियाचा परफॉर्मन्स उजवा होता. पण एका खेळाडूंच्या कामगिरीमुळे टेन्शन आहे.

सर्वप्रथम शार्दुल ठाकूर. मीडियम पेस गोलंदाजी आणि उपयुक्त फलंदाजी ही शार्दुलची खासियत आहे. 2019 च्या वर्ल्ड कपनंतर शार्दुल वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. ऑलराऊंडर असल्यामुळे शार्दुल ठाकूरला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळतं. त्यासाठी काहीवेळा मोहम्मद शमीला बाहेर बसवलं जातं. मागच्या काही सामन्यात शार्दुलने अपेक्षित कामगिरी केलेली नाही. मोहालीमध्ये शार्दुल महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10 ओव्हरमध्ये 78 धावा देऊन एकही विकेट काढला नाही. अशावेळी मुख्य वेगवान गोलंदाजाच्या जागी शार्दुलचा टीममध्ये समावेश करणं कितपत योग्य आहे?. दिग्गज खेळाडूच बलिदान कधीपर्यंत?

शार्दुल ठाकूर खराब प्रदर्शन करतोय. पण त्याचवेळी मोहम्मद शमीने आपल्या जबरदस्त कामगिरीने टीम इंडियासमोर प्रश्न निर्माण केलाय. टीमची फलंदाजी भक्कम होते, म्हणून शार्दुल ठाकूरला सातत्याने खेळवलं जातय. आशिया कपमध्ये शामीला बाहेर बसाव लागलं. शमीला जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्याने कमालीची कामगिरी केलीय. मोहालीमध्ये शमीने 10 ओव्हरमध्ये 51 धावा देऊन 5 विकेट काढल्या. टीम इंडिया जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना सातत्याने खेळवत आहे. अशा प्रदर्शनानंतर शमीकडे दुर्लक्ष करणं कितपत योग्य होईल. ही चूक वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला भारी पडू शकते.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.