
Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला हैदराबाद विरोधातील सामन्यात चमकदार कामगिरी करण्याची संधी होती. पण त्याला सातत्य टिकवता आले नाही. आपल्या फटकेबाजीने आणि दमदार शॉट्ससाठी सूर्यवंशी वैभवाच्या शिखारावर आहे. एलिट ग्रुप बीच्या सामन्यात बिहारसाठी त्याला मैदानावर फार काळ टिकता आले नाही. तो केवळ 11 चेंडू खेळला. तो मैदानावर असल्याने गोलंदाज त्याला झटपट बाद करण्यासाठी तयारीतच होते. पण त्याने दोन तडाखेबंद चौकार लावताच गोलंदाजांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. याला बाद केले नाहीतर हा धावांचा डोंगर उभारले हे हैदराबादने जाणले होते. त्यामुळे वैभवला त्यांनी धावपट्टीवर रमूच दिले नाही. तो 11 चेंडूत 11 धावा काढुन बाद झाला. यापूर्वी वैभवने गोवा विरोधात चांगली कामगिरी केली होती. त्याने 46 धाव केल्या होत्यात तर महाराष्ट्र संघाविरोधात त्याने सरस कामगिरी बजावली होती. वैभवने नाबाद 108 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे वैभवची लय आणि सूर या हैदराबादविरोधातही कायम राहतील अशी भीती होती. पण तो बाद होताच हैदराबाद संघातील गोलंदाजांनी जल्लोष केला. पण तो जोपर्यंत धावपट्टीवर होता, तोपर्यंत गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांना घाम गाळावा लागला.
वैभवचीच पहिली विकेट
कोलकत्ता येथील जाधवपूर मैदानावर हैदराबाद विरुद्ध बिहार असा सामना झाला. नाणेफेक जिंकून बिहारने फलंदाजी स्वीकारली. बिहारसाठी वैभाव सूर्यवंशीने कर्णधार साकिबुल गणी याच्यासह धावपट्टीवर दीर्घकाळ थांबण्याचा निर्धार केला. पण फलकावर 28 धावा झळकताच तो बाद झाला. वैभवला लागलीच तंबूत परत पाठवण्यात हैदराबादचे खेळाडू यशस्वी झाले.
वैभव सूर्यवंशीने एशिया कप रायझिंग स्टारमध्ये दमदार खेळी केली होती. या टुर्नामेंटमध्ये इंडिया अ संघासाठी वैभवने 4 सामन्यात 243.88 च्या स्ट्राईक रेटनुसार 239 धावा चोपल्या होत्या. यादरम्यान वैभव सूर्यवंशीने युएईविरोधातील सामन्यात 42 चेंडूत 144 धावांची तुफानी खेळी खेळली. त्याचे नाव जागतिक स्तरावर झाले. त्यामुळे सूर्यवंशी आता बिहारला पुन्हा वैभवाच्या शिखरावर नेण्यासाठी अशी तुफानी खेळी खेळल का? आणि बिहारला पहिला विजय मिळवून देईल का, याची चर्चा होत आहे. गुणतालिकेत बिहार सध्या रसातळाला आहे. त्याला बाहेर आणण्यासाठी संघाच्या कर्णधारासह उपकर्णधार वैभववर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.