Rinku Singh IPL 2022: रिक्षा चालवून IPL पर्यंत पोहोचलेल्या मुलाचा फॅन झाला आमिर खान, म्हणाला, ‘काय खेळत होता यार तो…’ VIDEO

Rinku Singh IPL 2022: त्याने आपल्या शानदार प्रदर्शनाने सर्वांचच मन जिंकलं. लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्धच्या सामन्यात रिंकूने 15 चेंडूत 40 धावा फटकावून संघाला जवळपास विजय मिळवून दिला होता.

Rinku Singh IPL 2022: रिक्षा चालवून IPL पर्यंत पोहोचलेल्या मुलाचा फॅन झाला आमिर खान, म्हणाला, काय खेळत होता यार तो... VIDEO
Rinku singh-Aamir khan
| Updated on: May 22, 2022 | 2:00 PM

मुंबई: कोलकाता नाइट रायडर्सचा Rinku Singh आयपीएल 2022 (IPL 2022) च्या स्टार खेळाडूंपैकी एक आहे. चालू सीजनमध्ये रिंकू सिंहला फक्त सात सामन्यांमध्ये संधी मिळाली, पण त्याने आपल्या शानदार प्रदर्शनाने सर्वांचच मन जिंकलं. लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्धच्या सामन्यात रिंकूने 15 चेंडूत 40 धावा फटकावून संघाला जवळपास विजय मिळवून दिला होता. या सामन्यात रिंकूची फलंदाजी ज्यांनी पाहिली, त्यांना ही इनिंग कायमस्वरुपी लक्षात राहील. आता बॉलिवूडचा सुपरस्टार आमिर खानही रिंकू सिंहचा फॅन झाला आहे. “रिंकूने शानदार प्रदर्शन केलं. त्याने स्वत:च्या बळावर जवळपास मॅच जिंकूनच दिली होती. पण फिल्डरने त्याचा अप्रतिम झेल घेतला, हे दुर्भाग्य ठरलं. रिंकून संघाची नौका किनाऱ्याला लावलीच होती. खेळात हार-जीत सुरुच असते” असं आमिर खान म्हणाला.

आमिरच्या तोंडून कौतुक ऐकून रिंकू म्हणाला….

रिंकूने सुद्धा आमिर खानकडून कौतुकाचे हे शब्द ऐकून त्याचे आभार मानलेत. “माझी फलंदाजी तुम्हाला आवडली, हे ऐकून मी खरोखरच आनंदीत आहे” असं रिंकूने म्हटलं.

गॅस सिलिंडर पोहोचवण्याचं काम करायचे

12 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये रिंकू सिंहचा जन्म झाला. क्रिकेटपटू बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. पाच भावंडांमध्ये रिंकू तिसरा आहे. त्याचे वडील गॅस सिलिंडर पोहोचवण्याचं काम करायचे. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने क्रिकेटर बनण्याच स्वप्न साकार करण्यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली.कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या रिंकूने झाडू मारण्याची नोकरी केलीय. ऑटो रिक्षा सुद्धा चालवली आहे.

9 वी पर्यंत शिक्षण

बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातून तो पुढे आला आहे. रिंकू सिंहच शिक्षण फार झालेलं नाहीय. 9 वी पर्यंत त्याचं शिक्षण झालं आहे. नववीची परिक्षा तो पास करु शकला नाही. दिल्लीत एका स्पर्धेत त्याला मॅन ऑफ द सीरीज म्हणून बाइक मिळाली होती. ती त्याने आपल्या वडिलांना देऊन टाकली