या दोन दिग्गज भारतीय खेळाडूंचे करिअर संपुष्टात, बीसीसीआयने संघातून वगळले
Team India : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियानंतर दक्षिण आफ्रिदे सोबत टेस्ट, वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे. यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा देखील केली आहे. पण या टीममध्ये २ भारतीय दिग्गज खेळाडूंना वगळण्यात आले आहे. त्यामुळे या खेळाडूंचे करिअर संपुष्टात आल्याची चर्चा आहे.
India vs Africa : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( Ind vs SA ) यांच्यात वनडे, टेस्ट आणि टी-20 मालिका रंगणार आहे. दोन्ही संघात 3 सामन्यांची टी-20 मालिका 10 डिसेंबरपासून सुरू होत आहे. यानंतर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर कसोटी मालिका देखील खेळवली जाणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 सामन्यांची कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने संघ जाहीर केला आहे.
रोहित आणि विराटला विश्रांती
रोहित शर्मा आणि विराट कोहलीने T20 आणि ODI मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. हे दोघेही कसोटी मालिकेसाठी परतणार आहेत. टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. पण यामध्ये दोन नावांना संधी मिळाली नाही. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची नावे वगळण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेसारख्या मोठ्या मालिकेसाठी भारताकडे त्यांचे दोन सर्वात अनुभवी फलंदाज या टीममध्ये नाहीयेत. त्यामुळे पुजारा आणि रहाणेची कारकीर्द संपली का अशा चर्चा क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे.
दिग्गज खेळाडूंना वगळले
भारतासाठी अनेक कसोटी सामने स्वबळावर जिंकवणाऱ्या चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्याकडे बीसीसीआयने दुर्लक्ष केले आहे. गेल्या 1-2 वर्षांत चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी भारतीय संघासाठी फारसे योगदान दिलेले नाही. त्यामुळे त्यांना संघात संधी मिळाली नाही. दोघेही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
पुजाराला वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतून वगळण्यात आले. आता या दोघांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही वगळण्यात आले. त्यामुळे BCCI पुजारा आणि रहाणेचा पर्याय शोधत आहे. पुजारा आणि रहाणे यांची कसोटी कारकीर्द संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया
रुतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, अविनाश कुमार. अर्शदीप सिंग, दीपक चहर.
कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रुतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद कुमार. , जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिद्ध कृष्णा.
T20 मालिकेसाठी टीम इंडिया
यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार) , वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.