मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधियांच्या हस्ते MPL स्पर्धेचे उद्घाटन, बंगळुरूच्या विजयावर काय म्हणाले?

मध्य प्रदेशमध्ये एमपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले.

मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य सिंधियांच्या हस्ते MPL स्पर्धेचे उद्घाटन, बंगळुरूच्या विजयावर काय म्हणाले?
jyotiraditya scindia
| Updated on: Jun 05, 2025 | 8:00 PM

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ग्वालियर येथे आज (5 जून) मध्य प्रदेश लिगच्या दुसऱ्या पर्वाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. यावेळी बोलताना आज प्रत्येकाच्या नसा-नसात क्रिकेट संचारत आहे. क्रिकेट हा फक्त एक खेळ नाही. तर या खेळाच्या माध्यमातून कोट्यवधी भारतीय एकमेकांशी जोडले जातात, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

सिंधिया यांनी सांगितल्या जुन्या आठवणी

या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे मलादेखील एक नवी उर्जा मिळाल्यासारखे वाटत आहे, असे म्हणत यावेळी सिंधिया यांनी त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या. माझे वडील माधवराव सिंधिंया यांच्यामुळे मला जभरातील महान क्रिकेटपटूंशी संवाद साधता आला. तेव्हाच्या काळापासून आजपर्यंत क्रिकेट या खेळात अनेक बदल झाले आहेत, असेही ते म्हणाले. सोबतच त्यांनी मध्यप्रदेश प्रिमियर लिग आयोजित करणाऱ्या आयोजकांचेही आभार मानले.

बंगळुरू संघाच्या विजयावरही केलं भाष्य

यंदाच्या आयपीएल चषकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाने आपलं नाव कोरलं. या संघाचे नेतृत्त्व रजत पाटीदार याने केले होते. रजत पाटीदार हा मूळचा मध्य प्रदेशचा आहे. याचाही उल्लेख सिंधिया यांनीक केला. त्यांनी बंगळुरू संघाचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी आयपीएल चषक बंगळुरू संघ जिंकलेला आहे. याच संघाचे नेतृत्त्व मध्य प्रदेशच्या रजत पाटीदार याने केले असून तो मूळ मध्य प्रदेशचा आहे. ही आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार सिंधिया यांनी काढले.

एमपीएल स्पर्धा ही लॉन्चपॅड- सिंधिया

यासह त्यांनी मध्य प्रदेश प्रिमियर लिग ही स्पर्धा एका लॉन्चपॅडप्रमाणे आहे. या स्पर्धेतील खेळाडूंची कामगिरी पाहण्यासाठी आयपीएलचे निवडणकर्तेदेखील येतात. गेल्या वर्षी याच स्पर्धेत खेळणारे एकूण 11 खेळाडू आयपीएल स्पर्धेत निवडले गेले, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, एमपीएल ही स्पर्धा 12 जून रोजीपासून सुरू होईल. ग्वालियर येथील श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाईल. या स्पर्धेत एकूण पाच पुरूष क्रिकेट संघांत समना होईल. तसेच तीन महिला संघदेखील या स्पर्धेत सहभागी होतील.