AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उस्मान तारिकची कॉपी करणं श्रीलंकन खेळाडूला पडलं महागात, पंचानी एका क्षणात शिकवला धडा Video

पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारिक त्याच्या हटके गोलंदाजी शैलीमुळे चर्चेत आला. थांबून गोलंदाजी करत असल्याने फलंदाजांना अनेकदा चकवा बसतो. तसेच जोरदार फटकेबाजी करताना विकेट देऊन बसतात. पण ही शैली एका श्रीलंकन गोलंदाजाला महागात पडली.

उस्मान तारिकची कॉपी करणं श्रीलंकन खेळाडूला पडलं महागात, पंचानी एका क्षणात शिकवला धडा Video
उस्मान तारिकची कॉपी करणं श्रीलंकन खेळाडूला पडलं महागात, पंचानी एका क्षणात शिकवला धडा VideoImage Credit source: Matthew Lewis-ICC/ICC via Getty Images
| Updated on: Mar 25, 2026 | 8:47 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानला सुपर 8 फेरीत गाशा गुंडाळावा लागला. असं असलं तर पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारिक भाव खाऊन गेला. त्याची गोलंदाजीच्या स्टाईलवरून सोशल मीडियावर मीम्स वगैरेही तयार केले गेले. उस्मान तारिक शॉर्ट रनअपवरून चालत येतो आणि चेंडू टाकण्यापूर्वी थांबतो. त्यानंतर चेंडू टाकतो. त्यामुळे फलंदाज काय करणार याचा अंदाज आधीच येतो. फलंदाजांनाही त्याला आक्रमक फटकेबाजी करणं सोपं जात नाही. अनेकदा जोरदार फटकेबाजी करण्याच्या नादात विकेटही टाकतात. उस्मान तारिकची गोलंदाजी भारतीय फलंदाजांसमोर चालली असं म्हणायला हरकत नाही. टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरीत दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात उस्मान तारिकने 4 षटकं टाकली आणि 24 धावा देत एक विकेट काढली. सूर्यकुमार यादवला बाद केलं. अशा उस्मान तारिकची कॉपी करणं श्रीलंकन खेळाडूला महागात पडलं.

श्रीलंकेतील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत एका फिरकीपटून उस्मान तारिकची कॉपी करण्याचा प्रयत्न केला. पण पंचांना त्याची शैली रूचली नाही. त्याने चेंडू टाकताच पंचांना पुढच्या सेकंदाला चेंडू डेड घोषित केला. श्रीलंकेतील रिचमंड आणि महिंदा कॉलेजमध्ये हा सामना सूरू होता. तेव्हा रिचमंडचा फिरकीपटू नेथुजा बसिथा याने तारिकच्या शैलीत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. पण त्या शैलीतही त्याने एडिशन घेतलं. चेंडू टाकताना थांबला आणि हलक्या उड्या मारल्या. त्यानंतर चेंडू टाकला. पण पंचांनी हा चेंडू डेड असल्याचं सांगितलं.

काय सांगतो नियम?

क्रिकेटच्या नियमानुसार गोलंदाज फलंदाजाचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करू शकत नाही. जर असं काही केलं तर पंच हा चेंडू डेड घोषित करतात. खरं तर बसिथाची गोलंदाजी शैली तारिकसारखी नाही. त्यामुळे त्याने फलंदाजाचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केल्याचा पंचांच्या निदर्शनास आलं. उस्मान तारिक प्रत्येक चेंडू टाकताना थांबतो. त्याची ती शैली आहे. जर तारिकने न थांबता चेंडू टाकला तर मात्र त्या शैलीवर आक्षेप घेतला जाईल.

Follow Us
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....