AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: तू कोण आहेस? युवराज सिंगच्या वडिलांनी थेट आर अश्विनला सुनावलं

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी माजी क्रिकेटपटू योगराज सिंग आणि आर अश्विन यांच्यात जुंपली आहे. आर अश्विनने अर्जुन तेंडुलकरबाबत एक विधान केलं होतं. त्यामुळे योगराज सिंग यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी आर अश्विनला खडे बोल सुनावले.

IPL 2026: तू कोण आहेस? युवराज सिंगच्या वडिलांनी थेट आर अश्विनला सुनावलं
IPL 2026: तू कोण आहेस? युवराज सिंगच्या वडिलांनी थेट आर अश्विनला सुनावलंImage Credit source: PTI
| Updated on: Mar 25, 2026 | 8:25 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेपूर्वी ट्रेड विंडोच्या माध्यमातून लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकरला घेतलं. गेल्या चार वर्षांपासून अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्सचा भाग होता. मात्र त्याला हवी तशी संधी मिळाली नाही. त्यामुळे आता लखनौ सुपर जायंट्सचा भाग असल्याने प्लेइंग 11 चा भाग असेल असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. पण माजी क्रिकेटपटू आर अश्विनने अर्जुन तेंडुलकरला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणं कठीण असल्याचं सांगितलं आहे. आर अश्विनच्या मते, लखनौ सुपर जायंट्स संघात एकापेक्षा एक सरस वेगवान गोलंदाज आहेत. अशा स्थितीत त्याला बेंचवर बसण्याशिवाय पर्याय नाही. लखनौ सुपरजायंट्स या पर्वात अर्जुन तेंडुलकरला एकाही सामन्यात खेळवणार नाहीत. कारण त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजांची संपूर्ण फौज आहे, असं विधान आर अश्विननं केलं. या विधानानंतर युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांचा संताप झाला आहे. त्यांनी आर अश्विनचं वक्तव्य मूर्खपणाचं असल्याचं म्हंटलं आहे.

योगराज सिंग म्हणाले की, “अश्विनचं म्हणणं मूर्खपणाचं आहे. तो कोणीही असो, त्याला एखाद्याबद्दल काय बोलायचं हे कळायला हवं. तो टीव्हीवर बसून म्हणतोय, ‘तो हे करू शकत नाही, तो ते करू शकत नाही. काय करतोयस भावा?'” योगराज सिंग पुढे म्हणाले की, “जेव्हा अर्जुन इथे होता, तेव्हा मी युवीला सांगितले होते की तुम्ही लोक अर्जुन तेंडुलकरबद्दल चुकीच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहात. अर्जुन अजिबात गोलंदाज नाही; त्याला पाठीच्या कण्याचा त्रास आहे, त्याचा हात 45 अंशात वाकतो. मी गोव्यातील त्याच्या प्रशिक्षकाला सांगितले होते. तुम्ही लोक काय करत आहात? हा खेळाडू षटकार आणि चौकार मारतो. जर तुम्हाला हे जमत नसेल, तर त्याला माझ्याकडे पाठवा.'”

योगराज पुढे म्हणाले, “मी तुम्हाला आव्हान देतो, जर अर्जुन तेंडुलकरने माझ्यासोबत सहा महिने घालवले, तर तो जगातील प्रत्येक फलंदाजाला हरवेल. जर तसे झाले नाही, तर मी माझी दाढी काढेन. मी माझे काम असेच करतो.” अर्जुन तेंडुलकर आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत फक्त पाच सामने खेळला आहे. त्यात त्याने 3 विकेट काढले, पण त्यासाठी बऱ्याच धावा खर्च केल्या.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल