26 वर्षीय कर्णधाराने ठोकले 6 षटकार, 11 चेंडूत 56 धावा, 157 धावांनी संघाला मिळवून दिला विजय

या खेळाडूने एक कर्णधाराची इनिंग चोखरित्या खेळत नाबाद 91 धावा लगावल्या. संघाला विजय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या या खेळाडूने सर्वांचीच मनं जिंकली.

26 वर्षीय कर्णधाराने ठोकले 6 षटकार, 11 चेंडूत 56 धावा, 157 धावांनी संघाला मिळवून दिला विजय
गरहार्ड एरासमस
| Edited By: | Updated on: Aug 23, 2021 | 12:32 PM

मुंबई : क्रिकेटमध्ये 6 चेंडूवर 6 षटकार ठोकण्यात आलेले काही सामने आहेत. ज्यांची चर्चा सर्व जगभर झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गिब्जनंतर भारताचा सिक्सर किंग युवराजनेही कामगिरी केली होती. अलीकडे अनेक स्थानिक स्पर्धांमध्ये असे विक्रम झाले आहेत. पण आम्ही आज तुम्हाला सांगतोय त्या सामन्यात सलग 6 चेंडूवर 6 षटकार ठोकले गेले नसून संपूर्ण सामन्यात 26 वर्षीय कर्णधाराने ही कामगिरी केली आहे. पण तरी देखील त्याने केवळ 11 चेंडूत 56 धावा करत संघाला विजय मिळवून दिला आहे. हा सामना पार पडला तो नामिबिया ईगल्स विरुद्ध झिंबाब्वे इमर्जिंग प्लेयर्स या संघामध्ये. यावेळी नामिबिया ईगल्सचा कर्णधार गरहार्ड एरासमसने दमदार खेळी केली.

50 षटकांच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत नामिबिया ईगल्सने 8 विकेट्सच्या बदल्यात 367 धावा ठोकल्या. नामिबिया ईगल्स संघाने सुरुवात चांगली केली नाही. 4 धावांवर त्यांचे 2 गडी तंबूत परतले. पण त्यानंतर यष्टीरक्षक जेन ग्रीन आणि जेन निकोलने तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. ग्रीनने 96 तर निकोलने 80 धावा केल्या.

26 वर्षीय कर्णधाराची कमाल

ग्रीन आणि निकोल यांनी केलेल्या शतकी भागिदारीनंतर मात्र 26 वर्षीय कर्णधार एरासमसने धडाकेबाज खेळी करत 47 चेंडूत नाबाद 91 धावा केल्या. त्याने 5 चौकार आणि 6 षटकार ठोकले. विशेष म्हणजे पहिल्या 56 धाव त्याने केवळ 11 चेंडूत केल्या.  ज्यानंतर झिंबाब्वे इमर्जिंग प्लेयर्सने 368 धावांचा पाठलाग करताना खराब खेळीचे दर्शन घडवले. ते पूर्ण 50 ओव्हरही खेळू शकले नाहीत. ते 37.3 ओव्हरमध्ये केवळ 210 धावा करत सर्वबाद झाले. केवळ सलामीवीर ब्रायनने 51 धावा केल्या. ज्यामुळे नामिबिया ईगल्सने दमदार असा 157 धावांनी विजय मिळवला.

इतर बातम्या

विश्वचषक विजेता कर्णधार डॅरेन सॅमीला भारत नाही, ‘हा’ संघ वाटतो यंदाच्या टी-20 विश्व चषकाचा दावेदार, वाचा कारण

IPL 2021 आणि टी-20 विश्वचषकात हार्दिक पंड्या गोलंदाजी करणार? भारतीय प्रशिक्षकाने दिली मोठी माहिती

भारतीय खेळाडूंचे हे ‘एडिटेड’ फोटो तुम्ही पाहिले का?, विराटचा फोटो तर पाहाच

(Cricketer Gerhard erasmus plays captain knock for namibia eagles hit 6 sixes)