हार्दीक पंड्याच्या अडचणी वाढल्या, संघातून बाहेर झाल्यानंतर आता 5 कोटींची 2 घड्याळंही जप्त

| Updated on: Nov 15, 2021 | 9:56 PM

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दीक पंड्याला अनेक संधी दिल्यानंतरही तो खास कामगिरी करु न शकल्याने अखेर आगामी न्यूझीलंड दौऱ्यातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

1 / 5
टी20 वर्ल्ड कप 2021 मध्ये खराब प्रदर्शन केल्यामुळे हार्दिक पंड्याला आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांसाठी संघाबाहेर केलं आहे. खराब फॉर्मचं संकट समोर असतानाच आता नवं संकट पंड्याच्या नशीबी आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार हार्दिक पंड्याकडून 5 कोटीं रुपयांची 2 घड्याळं कस्टम विभागानं एयरपोर्टवर जप्त केली आहेत.

2 / 5
हार्दिककडे या घड्यांळांची बिलं नव्हती. त्याने याबद्दल माहितीही दिली नसल्याने ही कारवाई कऱण्यात आली. हार्दिक पंड्या हा रविवारी संघासोबत भारतात परतला याचवेळी एयरपोर्टवर कस्टम विभागाने ही कारवाई केली.

3 / 5
हार्दिक पंड्याला आधीपासूनचं महागड्या घड्याळांचा शौक आहे. आयपीएल 2021 दरम्यानही त्याने Phillippe Nautilus Platinum 5711 हे घड्याळ घातलं होतं. ज्याची किंमत 5 कोटीच्या घरात होती.

4 / 5
2019 साली हार्दिक पंड्या रुग्णालयात अॅडमिट असतानाही त्याने एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने सोन्याचं घड्याळ घातल्याचं दिसून येत होतं.

5 / 5
मागील वर्षीच हार्दिकचा भाऊ क्रुणाल याच्यावरही अशी कारवाई झाली होती. त्यानेही त्याच्या महागड्या वस्तूंबाबत कस्टम विभागाला माहिती न दिल्याने त्या जप्त करण्यात आल्या होत्या.